गंगानदीच्या स्वच्छतेसाठी संत आत्मबोधानंद (वय २६ वर्षे) यांचे १८० दिवसांपासून उपोषण

  • २७ एप्रिलपासून जलत्याग करून प्राणत्याग करणार !

  • पंतप्रधान मोदी आणि सयुंक्त राष्ट्राचे सरचिटणीस यांना पत्र

  • इतके दिवस उपोषण चालू असतांना प्रसारमाध्यमे झोपली होती का ?
  • यापूर्वी ८६ वर्षीय स्वामी सानंद यांनी गंगानदीच्या स्वच्छतेसाठी १११ दिवस उपोषण करूनही भाजप सरकारने त्यांची कोणतीही नोंद न घेतल्याने त्यांनी प्राणत्याग केला होता. त्यामुळे असे सरकार संत आत्मबोधानंद यांच्या उपोषणाची नोंद घेत नाहीत, यात आश्‍चर्य ते काय ?
  • संतांनी अशा प्रकारे उपोषण करून प्राणत्याग करण्याऐवजी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करावेत. हिंदु राष्ट्र आल्यावर सर्व समस्या सुटतील !
Brahmachari Atmabodhanand is on fast-unto-death in Jagjeetpur, agitating for a clean and free-flowing Ganga. (HT Photo)

हरिद्वार (उत्तराखंड) – केवळ २६ वर्षांचे असणारे केरळचे संत आत्माबोधानंद गंगानदीच्या स्वच्छतेसाठी गेल्या १८० दिवसांपासून येथे उपोषण करत आहेत. त्यांनी या संदर्भात पंतप्रधान मोदी आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस यांना पत्र लिहिले आहे. ‘मोदी यांच्या गंगानदी स्वच्छ न करण्याच्या हेतूमुळे मी २७ एप्रिलपासून पाण्याचाही त्याग करीन. आता प्राणत्याग करण्याविना माझ्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही’, असे त्यांनी यात म्हटले आहे. ‘ज्याप्रमाणे प्रा. अग्रवाल (स्वामी सानंद) (यांनीही गंगानदीच्या स्वच्छतेसाठी उपोषण करून प्राणत्याग केला होता.) यांनी त्यांच्या शरिराचा गंगानदीला वाचवण्यासाठी त्याग केला, तसा त्याग मीही करीन’, असे त्यांनी म्हटले आहे.

१. संत आत्माबोधानंद यांनी म्हटले आहे की, मी गंगानदीच्या स्वच्छतेसाठी उपोषणाला बसलो आहे; मात्र केंद्र आणि राज्य सरकार यांनी माझ्या ११ मागण्यांची नोंदही घेतलेली नाही.

२. एका दैनिकाच्या प्रतिनिधीला त्यांनी सांगितले की, मी गंगानदीच्या स्वच्छतेची आशा सोडली आहे. या पवित्र नदीमध्ये प्राणत्याग करण्यास मला भीती वाटत नाही.

३. संत आत्माबोधानंद यांनी या पत्रात गंगा आणि त्यांच्या साहाय्यक नद्या (भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी, पिंडर आणि धौलीगंगा) यांवरील बांधण्यात आलेली धरणे आणि प्रस्तावित प्रकल्प रहित करण्याचीही, तसेच गंगानदीच्या मैदानी भागामध्ये होणारा वाळूचा उपसा आणि जंगलतोड यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. गंगानदीला वाचवण्यासाठी कायदा बनवून स्वायत्त गंगा भक्त परिषदेची स्थापना करण्याची मागणी केली आहे.

४. ते म्हणाले की, येथे गंगानदीतून वाळूचा उपसा चालू असल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘नमामि गंगे’ या योजनेच्या नियमांचे उल्लंघन होत आहे.

५. गंगानदीच्या परिसरात कोणत्याही वैज्ञानिक अभ्यासाविना बांधकामे चालू आहेत. गंगानदीच्या औषधीय गुणांचा र्‍हास होत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now