(म्हणे)प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देऊन पतंप्रधान मोदी अयोग्य गोष्टींना थारा देत आहेत !

काँग्रेसचे राजीव गौडा यांचे प्रतिपादन

पणजी,२१ एप्रिल (वार्ता.) – भाजपने भोपाळ मतदारसंघासाठी साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर या मालेगाव बाँबस्फोटातील एक आरोपी आहेत. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन केले आहे. राजकीय पक्ष योग्य-अयोग्य यांची पारख करण्याची क्षमता हरवून बसतो,तेव्हा असे घडते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची ही नवीन व्याख्या आहे का ? पंतप्रधान मोदी अयोग्य गोष्टीचे महत्त्व वाढवून त्यांना थारा देत आहेत, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस घोषणापत्र समितीचे समन्वयक राजीव गौडा यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.(काँग्रेसने नसलेला हिंदु आतंकवाद निर्माण केला,तेव्हा काँग्रेसवाले योग्य-अयोग्य यांची पारख करण्याची क्षमता हरवून बसले होते का ?हिंदु आतंकवादाचे भूत निर्माण करणे हा काँग्रेसचा विकास होता का ?पाकिस्तानची भाषा बोलणार्‍या आणि भ्रष्टाचारी,गुन्हेगार यांना उमेदवारी देणार्‍या काँग्रेसला साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिली म्हणून बोलण्याचा अधिकार आहे का ?-संपादक)

राजीव गौडा पुढे म्हणाले,भाजपकडे आतंकवादी आक्र्रमणाचा आरोप नसलेले अन्य उमेदवार नाहीत का?प्रज्ञासिंह ठाकूर यांना यापूर्वी शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजप शासनाने एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येच्या आरोपावरून कह्यात घेतले होते.प्रज्ञासिंह ठाकूर सध्या आरोग्याच्या सूत्रावरून जामिनावर आहेत.प्रज्ञासिंह ठाकूर यांना न्यायालयाने अजूनही दोषमुक्त केलेले नसतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा पार्श्‍वभूमीच्या उमेदवाराला कसा पाठिंबा देतात ? (राजदचा उमेदवार शहाबुद्धीन याने वर्ष २००४ मध्ये बिहारमध्ये कारागृहातून निवडणूक लढवली होती,तर साध्वी प्रज्ञासिंह केवळ आरोपी आहेत म्हणून निवडणूक का लढवू शकत नाहीत ?-संपादक)


Multi Language |Offline reading | PDF