तेलंगणमधील मंदिरांच्या ८५ सहस्र एकर भूमीपैकी २४ सहस्र एकर भूमीवर भू माफियांचे अतिक्रमण

तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार सातत्याने हिंदुविरोधी निर्णय घेत असते. त्याच्या राज्यात हिंदूंच्या मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

भाग्यनगर – तेलंगण राज्यातील मंदिरांच्या सुमारे २४ सहस्र एकर भूमीवर भू माफियांनी अतिक्रमण केल्याची माहिती समोर आली आहे. या भूमीचे क्षेत्रफळ इतके आहे की, भाग्यनगरच्या बाहेर सायबराबाद या उपनगरासारखी २ उपनगरे वसवण्यात येऊ शकतात.

१. संपूर्ण राज्यामध्ये मंदिरांना दानात मिळालेली भूमी ८७ सहस्र एकर इतकी आहे आणि त्यांतील २५ टक्के भूमीवर अतिक्रमण झाले आहे.

२. अतिक्रमण करणार्‍यांनी ही भूमी अन्य लोकांना विकलीही आहे. भाग्यनगर आणि रंगा रेड्डी जिल्ह्यांमध्ये या भूमीवर अवैधरित्या शेतीही केली जात आहे.

३. धर्मादाय विभागाने गेल्या वर्षी राज्य सरकारकडे या भूमीविषयी अहवाल सादर केला आहे. यानुसार नालगोंडा जिल्ह्यामध्ये ३ सहस्र ५०० एकर भूमीवर अतिक्रमण झाले आहे. एकूण अतिक्रमणामध्ये हा आकडा सर्वाधिक आहे.

४. भाग्यनगर येथे २ सहस्र २००, तर रंगा रेड्डी जिल्ह्यामध्ये १ सहस्र ८०० एकर भूमीवर अतिक्रमण झाले आहे. एकूण अतिक्रमण झालेल्या भूमीपैकी १६ सहस्र एकर भूमी माफियांनी त्यांच्या नावावर नोंदवूनही घेतली आहे.

५. धर्मदाय आयुक्त अनिल कुमार म्हणाले की, काही लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण केले आहे. अशा सर्व जणांना ही भूमी मंदिराला परत देण्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी जर ती दिली नाही, तर बळाचा वापर करून ती कह्यात घेण्यात येईल आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल.

६. गेल्या ५० वर्षांमध्ये धर्मादाय विभागाने या भूमीचे कधीही सर्वेक्षण केलेे नाही. (इतकी वर्षे धर्मादाय विभाग झोपा काढत होते का ? प्रशासकीय सेवेत अशी हेळसांड करणार्‍या संबंधितांवर कारवाई करा ! – संपादक) सध्या महसूल विभागाने भू-अभिलेखाचे नूतनीकरण (अपडेट) करण्याचे काम चालू केल्यावर ही माहिती समोर आली. यानंतर सरकारने महसूल विभागाला सांगितले की, मंदिरांच्या मुख्य देवतेच्या नावाने भूमीविषयीचे पासबूक बनवावे.


Multi Language |Offline reading | PDF