चुकीचे मतदान केले म्हणून स्वतःचे बोट कापण्याचा मूर्खपणा !

लोकसभा निवडणूक २०१९ च्या निमित्ताने…

निरर्थक भारतीय लोकशाही !

सध्या भारतात लोकसभेची निवडणूक चालू आहे. एकूण ७ टप्प्यांमध्ये या निवडणुका होत आहेत. देशभर सर्वपक्षीय राजकारण्यांच्या प्रचारसभा रंगत आहेत. निवडणुकांच्या या रणांगणात अनेक अपप्रकारांना उधाण आले आहे. ‘जगातील सर्वांत मोठी निवडणूक’ म्हणून बहुमान (?) मिरवणार्‍या भारतीय लोकशाहीची ही स्थिती भारतासाठी खरेतर लज्जास्पद आहे. भारतीय राजकारणी आणि जनता यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आणि त्यांना अंतर्मुख करायला लावणारे हे नैमित्तिक सदर निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करत आहोत.

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर मतदारसंघात मतदान करणार्‍या एका तरुणाने चुकून भाजपला मत दिल्यामुळे प्रायश्‍चित म्हणून आपले बोट कापले. बीएस्पीचा कार्यकर्ता असतांना भाजपला मत दिले म्हणून हा युवक निराश झाला होता. त्यामुळे स्वतःवरील रागात त्याने मतदान केलेले बोट कापून घेतले; परंतु चूक झाली म्हणून अशी शिक्षा करून घेण्याची कुबुद्धी त्याला कुठून आली ? बहुजन समाजवादी पक्षाच्या अंतर्गत चालणार्‍या धोरण-शिकवणींमध्ये अशीही शिक्षा सांगितली आहे का, असा येथे प्रश्‍न पडतो. तसेच अशा घटनांवरून लोकशाहीचा घसरत चाललेला स्तर आणि वाढत चाललेली भयावहता लक्षात येते. साधनेचे किंवा ईश्‍वरी पाठबळ नसल्याने भरकटलेले युवक आज थातुर-मातुर कारणांवरून बोट कापून घेत आहेत, तर उद्या आत्महत्याही करतील. सर्वांत मोठ्या लोकशाहीमध्ये ‘साधना’ हा विषयच अंतर्भूत नसल्याने लोकशाहीच्या शेवटाकडे नेणार्‍या या प्रवासाचे मूक साक्षीदार होण्यापेक्षा हनुमंताप्रमाणे प्रत्येकात साधना रुजवून रामराज्यासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा करावी ! अगदी हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी रायरेश्‍वर येथे प्रतिज्ञा केली त्याप्रमाणे !


Multi Language |Offline reading | PDF