५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कल्याण येथील चि. श्रीराम उपेंद्र महाजन (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीराम महाजन हा एक आहे !

(वर्ष २०१५ मध्ये चि. श्रीराम उपेंद्र महाजन याची ५१ टक्के आध्यात्मिक पातळी होती. – संकलक)

चैत्र कृष्ण पक्ष तृतीया (२२ एप्रिल २०१९) या दिवशी चि. श्रीराम उपेंद्र महाजन याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या नातेवाइकांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. श्रीराम महाजन

चि. श्रीराम उपेंद्र महाजन याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्म ते १ वर्ष

१ अ. आई आणि वडील भांडत असतांना श्रीराम जोरजोराने रडू लागणे अन् आई-वडिलांनी संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रासमोर उभे राहून क्षमा मागितल्यावर श्रीरामने त्यांच्याकडे पाहून हसणे : ‘श्रीराम ८ मासांचा असतांना एकदा मी आणि यजमान एकमेकांशी रागाने अन् मोठ्याने बोलत होतो. तेव्हा काही मिनिटांतच श्रीराम जोरजोराने रडू लागला आणि आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली. त्यानंतर पुष्कळ वेळ तो आम्हा दोघांकडे येत नव्हता. तेव्हा तेथे श्रीरामची आत्या (भाग्यश्रीताई) उपस्थित होती. तिने आम्हाला संत भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रासमोर उभे राहून क्षमा मागायला सांगितली आणि थोड्याच वेळात श्रीराम आमच्याकडे बघून हसला.

१ आ. आई रडत असतांना तिला परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पहाण्यास सांगून ‘तू रडू नकोस. सर्वकाही आबांना सांग’, असे सांगणे : श्रीराम एक वर्षाचा असतांना मला काही कारणाने रडायला येत होते. त्या वेळी श्रीराम माझ्याजवळच होता. मला देवाने मनातील सर्व दुःख परात्पर गुरुदेवांना सांगण्यास सुचवले होते; म्हणून मी रडत-रडत डोळे मिटून गुरुदेवांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. समोर परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र होते. तो मला ‘आबा, आबा’ करून परात्पर गुरुदेवांकडे बघण्यास सांगत होता (त्याच्यासमोर मी परात्पर गुरुदेवांना ‘आबा’ म्हणते.) आणि ‘तू रडू नकोस. सर्वकाही आबांना सांग’, असे सांगत होता.’ – सौ. भक्ती उपेंद्र महाजन (आई), कल्याण

२. वय १ ते ३ वर्षे

२ अ. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात एक संत आल्यावर आत्याला प्रार्थना सांगायला सांगून स्वतः हात जोडून उभे रहाणे : ‘तो दीड वर्षांचा असतांना आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. मी त्याला ध्यानमंदिरात घेऊन गेले होते. तेव्हा तेथे एक संत आले; म्हणून मी त्याला प्रार्थना करण्यास सांगितली. तेव्हा अर्धा घंटा मला प्रार्थना सांगायला सांगून तो स्वतः हात जोडून उभा होता.’

– सौ. भाग्यश्री जोशी (आत्या), सनातन आश्रम, मिरज.

२ आ. ‘लोणी प्रथम बाप्पाला दे’, असे आईने श्रीरामला सांगणे, ‘कोणत्या बाप्पाला लोणी दिलेस ?’, असे आईने विचारल्यावर त्याने श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवणे : ‘श्रीराम २ वर्षांचा असतांना मी लोणी काढल्यावर तो ते खायला आला. मी त्याला वाटीत लोणी दिले आणि सांगितले, ‘‘प्रथम बाप्पाला देऊन ये.’’ नंतर मी त्याला विचारले, ‘‘कोणत्या बाप्पाला लोणी दिलेस ?’’ तेव्हा त्याने श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बोट दाखवले.

२ इ. तो २ वर्षांचा असतांना मी त्याला जेवतांना आणि आरती करतांना हात जोडून प्रार्थना करायला सांगत असे. तेव्हा तोही आम्हा सर्वांकडून तसे करवून घेत असे.’

– सौ. राजश्री महाजन (आजी (वडिलांची आई))

३. वय ३ वर्षे ते आतापर्यंत जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

३ अ. ‘त्याची स्मरणशक्ती तीक्ष्ण आहे.

३ आ. तो मोठ्यांना आदराने नमस्कार करतो.’

– श्रीमती वैशाली पारकर (आजी (आईची आई)), कुडाळ सेवाकेंद्र

३ इ. ‘श्रीरामला सर्वांमध्ये मिळून-मिसळून रहायला आवडते.

३ ई. तो त्याच्या हातातील त्याला आवडणारी वस्तू किंवा खाद्यपदार्थ कोणी मागितल्यावर लगेच देतो.

३ उ. चिकाटी : त्याला हवी असलेली गोष्ट साध्य करण्यासाठी तो चिकाटीने प्रयत्न करतो आणि मिळवतो.

३ ऊ. आम्ही कधी दूरचित्रवाणी संच चालू केला, तर तो देवतांचे किंवा क्रांतीकारकांचे कार्यक्रम पहातो. इतर कार्यक्रम तो पहात नाही.’

– सौ. राजश्री महाजन

३ ए. इतरांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणे

१. ‘मी त्याच्यावर रागाने ओरडले की, तो ‘आई, हळू बोल’, असे सांगतो आणि माझा तोंडवळा हसरा होईपर्यंत माझ्याकडे बघत हसत रहातो.’ – सौ. भक्ती उपेंद्र महाजन

२. ‘घरात कोणी कोणावर ओरडून बोलायला लागल्यास तो गंभीर स्वरात त्या व्यक्तीला शांत रहायला सांगतो.’ – सौ. राजश्री महाजन

३ ऐ. भाव

३ ऐ १. ‘श्रीराम भावपूर्ण आरती करतो.’ – श्रीमती वैशाली पारकर

३ ऐ २. रामनाथी आश्रमात संतांची भेट न झाल्याने रडू लागणे आणि त्यांची आठवण काढल्यावर ‘आपण त्यांच्याकडे अन् कृष्णबाप्पाकडे जाऊया’, असे म्हणणे : ‘आम्ही रामनाथी आश्रमात गेल्यावर आम्हाला सत्संगासाठी एका कक्षात बसवले होते.

तेव्हा तेथे एक संत येणार होते आणि श्रीरामची त्यांना भेटण्याची धडपड चालू होती; परंतु काही कारणाने ते येऊ शकले नाहीत. तेव्हा तो लोटांगण घालून रडू लागला. आताही त्याच्यासमोर संतांचा विषय काढला की, तो ‘आपण त्यांच्याकडे आणि कृष्णबाप्पाकडे जाऊया’, असे म्हणतो.

४. अनुभूती – गुरुकृपेने आणि संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय केल्यामुळे श्रीराम आजारातून पूर्णपणे बरा होणे

४ अ. श्रीरामला आठ दिवस १०२ ते १०३ डिग्रीपर्यंत ताप येणे, तापाचे निदान न होणे आणि ‘तापाचे कारण आध्यात्मिक असण्याची शक्यता असल्याने प.पू. दास महाराजांना किंवा रामनाथी आश्रमात विचारा’, असे साधक आधुनिक वैद्य ढवण यांनी सांगणे : चि. श्रीराम दीड मासाचा होता. तेव्हा त्याला आठ दिवस १०२ ते १०३ डिग्रीपर्यंत ताप येत होता. आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे रक्ताच्या सर्व चाचण्या केल्या, तरी तापाचे निदान होत नव्हते. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘बाळाच्या मणक्यात पाणी झाले आहे. ते काढून कोल्हापूरला तपासणे आवश्यक आहे. मूल दगावूही शकते. त्याच्या वडिलांना बोलावून घ्या आणि लवकर निर्णय घ्या.’’ त्यामुळे मी घाबरून गेले; परंतु परात्पर गुरुदेवांच्या कृपेने तेथे डॉ. ढवण हे साधक होते. त्यांनी सांगितले, ‘‘श्रीरामला येणार्‍या तापाचे कारण आध्यात्मिक असू शकते, तरी तुम्ही प.पू. दास महाराजांना किंवा रामनाथी आश्रमात विचारा.’’

४ आ. प.पू. दास महाराज आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले उपाय चालू करणे : त्याप्रमाणे आम्ही प.पू. दास महाराजांना संपर्क केला. त्यांनी कुलदेवतेला प्रार्थना करून असोला नारळ ठेवण्यास सांगितले. आम्ही त्याप्रमाणे केले. नंतर रामनाथी आश्रमात संपर्क केल्यावर त्यांनी परात्पर गुरु पांडे महाराजांना संपर्क करण्यास सांगितला. परात्पर गुरु पांडे महाराजांनी तात्काळ उपायाचे मंत्र सांगितले आणि भ्रमणभाषवरून उपायही केले. परात्पर गुरु पांडे महाराजांनी सांगितलेले मंत्र आणि उपाय घरातील सर्वांनी वाटून घेऊन तसे चालू केले.

डॉ. ढवण यांनी सांगितले, ‘‘तुला आधुनिक वैद्यांच्या सांगण्यानुसार जायचे असेल, तर त्यांनी सांगितलेल्या सर्व चाचण्या आणि औषधे घ्यावी लागतील अन् जर तू अध्यात्माच्या मार्गाने जाणार असशील, तर पूर्ण श्रद्धा ठेवून सर्व उपाय पूर्ण कर आणि मला बाळाची स्थिती कळवत रहा.’’

४ इ. २ – ३ दिवस ताप चढणे आणि उतरणे, मनात वाईट विचार येऊन भीती वाटणे अन् परात्पर गुरुदेवांचे स्मरण केल्यावर स्थिर रहाता येणे : पुढे २ – ३ दिवस बाळाचा ताप चढत-उतरत होता. एक दिवस बाळाचा ताप १०४ डिग्री चढला; म्हणून त्याला सरकारी आधुनिक वैद्यांकडे नेले. त्यांनी प्रतिजैविक असलेले औषध दिले, तरीही ताप चढत-उतरत होता. त्या वेळी माझ्या मनात वाईट विचार येऊन मला पुष्कळ भीती वाटत होती. तेव्हा परात्पर गुरुदेवांचे स्मरण केल्यावर मला स्थिर रहाता येत होते.

४ ई. परात्पर गुरु पांडे महाराजांनी सांगितलेला उतारा उतरवल्यावर त्या रात्रीपासून बाळाला ताप न येणे : औषधे आणि आध्यात्मिक उपाय दोन्ही चालू होते. परात्पर गुरु पांडे महाराज सतत विचारपूस करत होते आणि वेगवेगळे उपाय सांगत होते. परात्पर गुरु पांडे महाराजांनी ८ व्या दिवशी तिन्ही सांजेला बाळावरून उतारा उतरवण्यास सांगितला. तो उतरवल्यावर त्या रात्रीपासून त्याला ताप आला नाही. (माझ्या चुलत भावाच्या मुलाला असाच ताप येत होता. त्याचेही निदान होत नव्हते. त्याचे वैद्यकीय अहवाल कोल्हापूरला पाठवले होते आणि त्याला पुढे काही दिवस नियमित २ सहस्र रुपयांचे इंजेक्शन घ्यावे लागत होते.)

४ उ. ताप येण्याचे कारण कळल्यावर गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होणे : नंतर मला परात्पर गुरु पांडे महाराजांनी भ्रमणभाषवरून सांगितले, ‘‘कोणाच्या तरी माध्यमातून सूक्ष्मातील वाईट शक्ती त्याला त्रास देत होती. तिची दृष्ट लागल्याने हा सर्व प्रकार घडला आहे.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करवून घेतलेल्या साधनेमुळे आणि डॉ. ढवण यांच्या सांगण्यामुळे, तसेच सर्व संतांच्या उपायांमुळे बाळ सुखरूप बरे झाले.

५. चि. श्रीरामचे स्वभावदोष

अ. रागीटपणा

आ. मध्यंतरी तो खोटे बोलत होता; पण त्यासंदर्भात त्याला समजावले. आता तो चूक न लपवता खरेच सांगतो.

६. आई म्हणून माझ्याकडून होणार्‍या चुका

अ. माझ्याकडून घरातील कामे प्रलंबित राहिल्यावर माझी घाई होते; म्हणून मी श्रीरामला दूरचित्रवाणीवर ‘छोटा भीम’ ही मालिका लावून देते. पूर्वी भ्रमणभाषवर गोष्टी लावून द्यायचे.

आ. मी घाई-गडबडीत असतांना श्रीरामने आवरायला वेळ लावला की, मी त्याच्यावर ओरडते.

इ. मी साधना म्हणून श्रीरामची सेवा करायला न्यून पडते.

ई. ‘श्रीराम झोपतांना त्याच्या कानात स्वयंसूचना म्हण’, असे ताईने (सौ. भाग्यश्री जोशी (श्रीरामची आत्या) यांनी) सांगितले आहे, तरी माझे त्यात सातत्य नसते.’

– सौ. भक्ती महाजन (२.७.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF