साध्वी प्रज्ञासिंह यांच्या शापाने कोणाला मरतांना पाहिलेले नाही ! – माजी सरकारी अधिवक्त्या रोहिणी सालियन

‘आंधळ्याला दिसत नाही; म्हणून सृष्टी नाही’, असे कधी म्हणता येईल का ?

नवी देहली – साध्वी प्रज्ञासिंह त्यांचा छळ झाल्याचे आणि त्यांना मारहाण करण्यात आल्याचे कुठलेच पुरावे न्यायालयात सादर करू शकल्या नव्हत्या. (पोलीस ‘थर्ड डिग्री’चा वापर करतात, तेव्हा ते मारहाण झाल्याचा कोणताही पुरावा उघड होणार नाही, याची काळजी घेतात, हे सालियन यांनाही ठाऊक आहे. केवळ कायद्याच्या भाषेत बोलून ते साध्वी यांना खोटे ठरवत असल्या, तरी जनतेला सत्य काय आहे, हे ठाऊक आहे ! – संपादक) त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ‘साध्वी यांच्या शापाने कोणी मेल्याचे बघितले नाही. आता त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. यामुळेच लोकप्रियता मिळवण्याच्या प्रयत्नात त्या अशी दायित्वशून्य विधाने करत असाव्यात’, अशी टीका मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला लढवणार्‍या माजी सरकारी अधिवक्त्या रोहिणी सालियान यांनी केली आहे. (साध्वी प्रज्ञासिंह यांनी असे विधान निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केलेले नाही, तर यापूर्वीही अनेकदा जाहीरपणे आणि प्रसारमाध्यमांच्या मुलाखतींमध्ये त्यांनी असेच सांगितले आहे. कदाचित् सालियन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून असे विधान करत असतील ! – संपादक) ‘हेमंत करकरे यांची अपकीर्ती टाळण्यासाठी आज मी बोलत आहे’, असेही त्यांनी सांगितले. (साध्वी प्रज्ञासिंह यांच्या गेल्या १० वर्षांत झालेल्या अपकीर्तीविषयी कोणीही बोलत नाही, हे लक्षात घ्या ! पोलीस आरोपी म्हणून एखाद्याला अटक करून त्याचा छळ करतात, सरकारी अधिवक्ताही त्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतात; मात्र न्यायालय त्यांची निर्दोष मुक्तता करते, त्या वेळी या आरोपीची झालेली अपकीर्ती पोलीस आणि सरकारी अधिवक्ता कधी भरून काढू शकतात का ? मडगाव स्फोटात सनातनच्या ६ साधकांची ४ वर्षांनी न्यायालयाने निर्दोष सुटका केली, त्यांच्या अपकीर्तीची कोणतीही हानीभरपाई त्यांना दिली गेली नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF