मी बाबरी तोडली आणि आता राममंदिरही उभारणार ! – साध्वी प्रज्ञासिंह

  • बाबरी मशीद पाडल्यापासून आतापर्यंत किती भाजपवाल्यांनी अशा प्रकारे दायित्व घेण्याचे धाडस दाखवून मंदिर बांधण्याचे सांगितले आहे ?
  • बाबरी मशीद पाडल्यावर भाजपने हात झटकून कारसेवकांना वार्‍यावर सोडून दिले होते, हे हिंदू विसरलेले नाहीत !

भोपाळ – आम्ही मंदिर बनवणारच. आम्ही बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यासाठीही गेलो होतो. मी स्वत: मशिदीवर चढून मशीद तोडली होती. ईश्‍वरानेच मला ही संधी दिली, शक्ती दिली आणि मी हे काम केले, याचा मला गर्व आहे. आता आम्ही तिथे राममंदिर उभारणारच, असे विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी येथे एका प्रचारफेरीच्या वेळी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले. त्यांच्या या विधानानंतर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावली.


Multi Language |Offline reading | PDF