हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याचा अमरावती येथील हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीचे संपर्क अभियान

अमरावती, २१ एप्रिल (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने कार्य करत असलेल्या हिंदु जनजागृती समितीचे कार्य येथील प्रत्येक हिंदुत्वनिष्ठापर्यंत पोेचावे, याकरिता समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचे संपर्क अभियान नुकतेच पार पडले. याला संत, हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ते यांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

पू. (डॉ.) संतोष कुमारजी महाराज यांना ग्रंथ भेट देतांना श्री. सुनील घनवट (उजवीकडे)

१. हिंदु जनजागृती समितीसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांची हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यकता आहे ! – पू. (डॉ.) संतोष कुमारजी महाराज, शिवधारा आश्रम

काळाची आवश्यकता पहाता हिंदु जनजागृती समितीसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांची हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यकता आहे. सनातन प्रभातसारख्या नियतकालिकांची समाजाला आवश्यकता असल्याने मी याविषयी प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करीन. अशा विविध उपक्रमांसाठी यापुढे आपण एकत्र येऊन कार्य करू, असे उद्गार शिवधारा आश्रमाचे पू. (डॉ.) संतोष कुमारजी महाराज यांनी काढले. या वेळी महाराजांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ हा ग्रंथ भेट देण्यात आला, तसेच सनातन प्रभातचा ‘धर्मांतर विशेषांक’ही दाखवण्यात आला. पू. (डॉ.) संतोष कुमारजी महाराज त्यांच्या कार्यक्रमांमधून नेहमीच लव्ह जिहाद, धर्मांतर यांच्या विरोधात प्रबोधन करत असतात.

२. आरोग्यविषयक मार्गदर्शन किंवा साहाय्य लागल्यास मी समितीला नेहमी सहकार्य करीन ! – प्रदीप तरडेजा, व्यवस्थापक, शिवधारा आश्रम

हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य समाजोपयोगी असून आरोग्यविषयक मार्गदर्शन किंवा साहाय्य लागल्यास मी समितीला नेहमी सहकार्य करीन. ‘समस्त हिंदुत्वनिष्ठ संस्थांनी एकत्र येऊन कार्य करावे’, असेच आमच्या आश्रमाचे धोरण आहे, असे मत शिवधारा आश्रमाचे व्यवस्थापक श्री. प्रदीप तरडेजा यांनी व्यक्त केले. ते समाजात ‘आरोग्य आणि स्वास्थ्य यांच्या सुरक्षेविषयी प्रबोधन अन् उपचार करतात.

डावीकडून समितीचे श्री. नीलेश टवलारे, हिंदुत्वनिष्ठ श्री. संजय चौहान, हिंदुत्वनिष्ठ श्री. नविन चौहान आणि श्री. सुनील घनवट

३. समितीला सदैव साहाय्य करण्यास सिद्ध असलेले हिंदुत्वनिष्ठ संजय चौहान आणि नविन चौहान !

अमरावती येथील प्रतिष्ठित उद्योजक आणि सिटी बस कंत्राटदार हिंदुत्वनिष्ठ श्री. संजय चौहान आणि त्यांचे बंधू श्री. नविन चौहान यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतल्यावर त्यांनी नातेवाईक आणि मित्र अशा ३५० जणांना ‘लव्ह जिहाद’चे ग्रंथ वितरित करण्याचा मानस व्यक्त केला. यासह त्यांनी समितीच्या वक्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले. ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची आवश्यकता असून त्यासाठी नेहमी साहाय्य करणार’, असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. समितीच्या वतीने त्यांना ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

४. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या बैठकीचे आयोजन !

अमरावती येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये अधिवक्ता चंद्रशेखर डोरले, अधिवक्ता एन्.बी. दुबे, अधिवक्ता नितीन कोल्हटकर, अधिवक्ता  सतिष उपाध्याय आणि अधिवक्ता सुनील मिश्रा उपस्थित होते. सर्वांना बैठकीमध्ये हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्याची माहिती देण्यात आली. ही माहिती जाणून घेतल्यावर ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु विधीज्ञ परिषद आवश्यक कार्य करत आहे’, अशी प्रतिक्रिया उपस्थित अधिवक्त्यांनी दिली. यापुढे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक न्यायालयीन लढ्यामध्ये सक्रीय सहभाग घेणार असल्याचे अधिवक्त्यांनी बैठकीमध्ये सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF