येणार्‍या काळात हिंदू वर्षभर चारधाम यात्रा करू शकतील ! – नितीन गडकरी, भाजप

विटा (जिल्हा सांगली), २१ एप्रिल (वार्ता.) – आमच्या विभागाने देशात १७ लक्ष कोटी रुपयांचे रस्ते केले. सध्या मानसरोवरला जाण्यासाठी नेपाळ आणि चीन मार्गे जावे लागते. आम्ही त्यासाठी उत्तराखंडमार्गे रस्ता बांधत आहोत. त्यामुळे नजीकच्या काळात हिंदूंना चीनमार्गे जाण्याची आवश्यकता नाही, तर ते उत्तराखंडातून मानसरोवर यात्रा करू शकतील. १२ सहस्र कोटी रुपये व्यय करून बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री येथे जाणारे ९०० किलोमीटरचे नवीन रस्ते बनवले जात आहेत. त्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले असून हिंदू लवकरच वर्षभर चारधाम यात्रा करू शकतील, असा विश्‍वास केंद्रीय दळणवळणमंत्री  श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ते विटा येथे खासदार श्री. संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

या वेळी गडकरी पुढे म्हणाले की,

१. यापुढील काळात ऊस कारखान्यांना वाचवणे सरकारला शक्य नाही. त्यामुळे केवळ उसावर अवलंबून न रहाता येणार्‍या काळात शेतकर्‍यांनी पीकपद्धत पालटावी. बांबू, तसेच अन्य माध्यमातून इथेनॉल बनवण्यास प्राधान्य द्यावे. सरकार शेतकर्‍यांचे इथेनॉल विकत घेईल. यातून किमान १ कोटीपेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळेल.

२. महाराष्ट्रात ५ लक्ष कोटी रुपयांची रस्त्याची कामे चालू आहेत. देहू, आळंदी, पंढरपूर, शेगाव, गाणगापूर, तुळजापूर, तसेच सर्वत्र रस्ते चालू आहेत. लवकरच पंढरपूरची आषाढी यात्रा करणार्‍या वारकर्‍यांसाठी विशेष रस्ता बांधण्यास आम्ही प्रारंभ करणार असून वारकरी खास गवताच्या मार्गातून पंढरपूर येथे जाऊ शकतील. ८ सहस्र कोटी रुपयांच्या मार्गाचा लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही प्रारंभ करणार आहोत.

३. २० सहस्र किलोमीटरचे जलमार्ग करण्याचा आम्ही निश्‍चय केला असून त्यातील १० मार्गांवर काम चालू आहे.

४. गंगेला शुद्ध करण्यासाठी आमच्या सरकारने ३० लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले असून त्यातील ३० टक्के काम पूर्ण झाले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now