देवा, तूच घडवतोस ।

‘२१.१२.२०१८ या दिवशी पहाटे मला नेहमीप्रमाणे जाग आली. तेव्हा देवाला आठवतांना मला एक वेगळाच आनंद मिळत होता. त्या आनंदात देवाने सुचवलेल्या ओळी त्याच्याच चरणी अर्पण करते.

श्रीमती शर्मिला पळणीटकर

उठताक्षणी तुला आठवावे ।
हा छंद लागला मनी ॥ १ ॥

तुला आठवण्यातच सरतो दिवस ।
मन त्याच आनंदात रहाते सतत ॥ २ ॥

त्या आनंदातच तुझ्या कृपेने सेवा मिळते ।
ती सेवाही तूच करवून घेतोस ॥ ३ ॥

देवा, तूच घडवतोस । देवा, तूच तारतोस ॥ ४ ॥

तुझ्या संगे रमण्यात । तुला आठवण्यात ॥
दिवस कसा सरतो । हे या अज्ञानी जिवास कळत नाही ॥ ५ ॥

– श्रीमती शर्मिला पळणीटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF