हा चमत्कार गुरुदेव करती, हे मात्र कोणा न कळे ।

कर्तेपणा कसा अर्पण करायचा हे कृतीतून शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘कु. करुणा मुळे हिच्यामुळे मला कविता सुचतात’, असे म्हटले. त्यानंतर श्री. वीरेंद्र मराठे यांना पुढील कविता सुचली.

श्री. वीरेंद्र मराठे
कु. करुणा मुळे

परात्पर गुरु डॉक्टरांना कविता स्फुरती कोणामुळे ।
परात्पर गुरु डॉक्टरांना कविता स्फुरती करुणा मुळे (टीप) ॥ १ ॥

परात्पर गुरु डॉक्टर स्वयं स्फूर्तीस्थान सर्व गोष्टींचे ।
हे जर आम्हा न कळे ।
तर आमच्यासारखे या जगात कुणी न खुळे ॥ २ ॥

कुटुंबातील एका साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीने ।
उद्धरती कुळेन् कुळे ।
हा चमत्कार गुरुदेव करती, हे मात्र कोणा न कळे ॥ ३ ॥

टीप – रामनाथी आश्रमातील साधिका कु. करुणा मुळे

– श्री. वीरेंद्र मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (१६.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF