हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध असणार्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’ची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

‘आदिशंकराचार्यांनी समाजव्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक उन्नति होण्यासमवेत पारलौकिक उन्नतीही होणे, या तीन गोष्टी साध्य करून देणार्‍यास ‘धर्म’ असे म्हटले आहे. सध्या समाज गुंडगिरी, भ्रष्टाचार, अनीती आणि अकार्यक्षमता यांनी जर्जर झाला आहे. राज्यशासन असून नसल्यासारखे, तसेच त्रासदायक झाले आहे. त्यामुळे यावर उपाय योजणे आणि समाजपुरुषाला पुन्हा सुस्थित करणे, हे प्रत्येक धर्मनिष्ठाचे कर्तव्य बनते. प्रचलित पत्रकारितेमध्ये अनेक दुर्गुणांचा प्रादुर्भाव झाला आहे, असे अनेक मान्यवरांचे मत आहे. अनेक जण याला समाजातील एकूणच ढासळलेल्या नैतिक मूल्यांचे प्रतिबिंब मानतात. समाजमन घडविण्यात मोलाचा हातभार लावू शकणार्‍या या माध्यमाचीच क्षमता योग्य प्रकारे पुनर्स्थापित करणे, हे एकूण समाजव्यवस्था सुस्थित करण्याला धर्म मानणार्‍यांचे प्रथम उद्दिष्ट ठरते.

समाजातील वस्तुस्थितीची जाणीव, त्यामागील कार्यकारणभाव, त्यावरील उपाययोजना या गोष्टी समाजमनाला समजाविणे, हा समाज सुस्थित करण्यातील पहिला टप्पा आहे. यासंदर्भात समाजातील वास्तव योग्य प्रकारे व्यक्तीपर्यंत पोचविणे महत्त्वाचे ठरते. नियतकालिक हे या कार्यासाठीचे महत्त्वाचे माध्यम आहे. नियतकालिकांमध्ये एखाद्या घटनेची केवळ माहिती देणार्‍या बातमीपासून लहान मुलांसाठीच्या गोष्टीपर्यंत अनेक सूत्रे मांडण्यात येतात; किंबहुना नियतकालिकांमध्ये न येणारे सूत्र कोणते, असे विचारल्यास त्यामधून जी व्यक्त होऊच शकत नाही तीच, असे उत्तर मिळेल. अशा या सर्व सूत्रांपैकी कोणत्या गोष्टी मांडायच्या, कोणत्या मांडू नयेत, मांडल्यास त्या कशा पद्धतीने मांडाव्या आणि त्यांतून नेमके काय आकलन करून घ्यायचेेे, याचा विचार करणे म्हणजे ‘पत्रकारिता’ होय. एखाद्या नियतकालिकात काय मांडले जाणार आहे, हे त्या नियतकालिककाराच्या पत्रकारिताविषयक दृष्टिकोनावरून ठरते. नियतकालिककाराचा हा दृष्टिकोन त्याच्या जीवनविषयक विचारांवर अवलंबून असतो.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘सनातनची पत्रकारिता’)

दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ७.४.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

यू.टी.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत दैनिक ‘सनातन प्रभात’ (मराठी) आणि तुलनेसाठी अन्य दोन दैनिक वृत्तपत्रे (मराठी) यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजण्यांच्या सर्व नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नकारात्मक ऊर्जा नसणे; पण चाचणीतील अन्य वृत्तपत्रांमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळणे

टीप – दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. त्याच्या संदर्भात ‘यू.टी. स्कॅनर’च्या भुजांनी ० अंशाचा कोन केला. (‘यु.टी. स्कॅनर’च्या भुजांनी ० अंशाचा कोन करणे याचा अर्थ ‘त्या वस्तूमध्ये (दैनिकामध्ये) नकारात्मक ऊर्जा मुळीच नाही’, असा होतो.)

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही.

२ आ १. चाचणीतील अन्य वृत्तपत्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा नसणे; पण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे : चाचणीतील अन्य वृत्तपत्रांमध्येे सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. त्या दैनिकांच्या संदर्भात ‘यू.टी. स्कॅनर’च्या भुजांनी ० अंशाचा कोन केला. (‘यू.टी. स्कॅनर’च्या भुजांनी ० अंशाचा कोन करणे याचा अर्थ ‘त्या दैनिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नाही’, असा होतो.)

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ १०.२२ मीटर होती.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ इ १. चाचणीतील तिन्ही दैनिकांची एकूण प्रभावळ

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ४’ मध्ये दिले आहे.

– श्री. अरुण डोंगरे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (८.४.२०१९)

सनातन प्रभातमधून सात्त्विकता प्रक्षेपित होणे !

  • ‘सनातन प्रभात’ मध्ये रज-तम प्रधान बातम्या छापाव्या लागल्या, तरी त्यातून सात्त्विकता प्रक्षेपित होण्याचे कारण म्हणजे त्याचा सात्त्विक उद्देश आणि त्यात सेवा करणारे साधक
  • ‘सनातन प्रभात’ नियतकालिक असल्यामुळे त्यात प्रतिदिन घडणार्‍या रज-तम प्रधान बातम्या छापाव्या लागतात.असे असले, तरी त्यातून सात्त्विकता प्रक्षेपित होते, हे उपकरणांद्वारे केलेल्या चाचण्यांमुळे सिद्ध झाले आहे. या सात्त्विकतेचे कारण म्हणजे नियतकालिकाचा उद्देश सत्त्वप्रधान समाजाची आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा आहे आणि नियतकालिकात सेवा करणारे सर्वजण साधक आहेत. ‘सनातन प्रभात’च्या सात्त्विकतेमुळे वाचकांना आणि साधकांना त्याच्या अनुभूतीही येतात.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’मध्ये सात्त्विकता असल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास असलेले अनेकजण आध्यात्मिक उपायांसाठी त्याचा वापर करतात आणि त्यांना त्याचा लाभही होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सनातन प्रभातविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

१. ‘सनातन प्रभात’ या दैनिकाचा पाया प.पू. डॉ. आठवले यांनी रचला असल्याने दैनिकाचे कार्य चिरंतन असणार्‍या मूळ ईश्‍वरी तत्त्वाशी संबंधित असणे

‘सनातन प्रभात’ या दैनिकाचा कार्य करण्याचा उद्देश हा बाजारू, म्हणजेच केवळ पैसे कमावण्याचा नाही, तर उदात्त ध्येयाशी संबंधित असलेल्या ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापने’शी आहे. या दैनिकाचा पाया प.पू. डॉ. आठवले यांनी रचला असल्याने दैनिकाचे कार्य चिरंतन असणार्‍या मूळ ईश्‍वरी तत्त्वाशी संबंधित आहे. हे दैनिक साधक ‘साधना’ म्हणून चालवत असल्याने त्यात रज-तमयुक्त स्पंदने नाहीत. यामध्ये मुळातच सात्त्विकता असल्याने त्याच्या केवळ अस्तित्वानेच वातावरण शुद्ध होते. याचा आध्यात्मिक स्तरावरील लाभ सर्वांना आपोआपच होत आहे.

२. ईश्‍वराच्या, प.पू. डॉक्टरांच्या, तसेच अनेक संतांच्या कृपाशीर्वादाने हे दैनिक चालू असल्याने त्याच्यावर धर्मद्रोह्यांकडून ‘बंदी’सारखी संकटे येऊनही त्याच्या ईश्‍वरी कार्यात कोणत्याच प्रकारचा खंड पडलेला नसणे

ईश्‍वराच्या, प.पू. डॉक्टरांच्या, तसेच अनेक संतांच्या कृपाशीर्वादाने हे दैनिक चालू असल्याने आर्थिक तोटा सोसूनही आणि त्याच्यावर धर्मद्रोह्यांकडून ‘बंदी’सारखी संकटे येऊनही त्याच्या ईश्‍वरी कार्यात कोणत्याच प्रकारचा खंड पडलेला नाही, उलट याचे कार्य सातत्याने चालूच असून ते वृद्धींगतही होत आहे.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


Multi Language |Offline reading | PDF