‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’चे प्रसारसाहित्य उपलब्ध !

साधकांना सूचना !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रसारासाठी उपयुक्त बॅनर आणि निमंत्रणपत्रिका हे प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. सर्व निमंत्रणपत्रिका ‘ए ५’ आकारांत आहेत. बॅनरचे आकार खाली दिले आहेत.

१. युवा शौर्य जागरण शिबिर – ७ फूट x ४ फूट

२. सामूहिक मंदिर स्वच्छता – ६ फूट x ३.५ फूट

३. प्रवचन : साधना व हिंदु राष्ट्र – ६ फूट x ३.५ फूट

४. माहिती अधिकार कार्यशाळा – ६ फूट x ३.५ फूट

सूचना : १. ज्या जिल्ह्यांमध्ये गेल्यावर्षीचे बॅनर आणि निमंत्रणपत्रिका शिल्लक असतील त्या जिल्ह्यांनी हे प्रसारसाहित्य प्राधान्याने वापरावे.

२. ज्या जिल्ह्यांमध्ये जुने बॅनर आणि जुन्या निमंत्रणपत्रिका नसतील ते जिल्हे प्रायोजक घेऊन नवीन प्रसारसाहित्य छापून घेऊ शकतात.


Multi Language |Offline reading | PDF