एका नावाजलेल्या रुग्णालयात शस्त्रकर्म करण्यापूर्वी रुग्णाला तपासण्यांच्या संदर्भात आलेले कटू अनुभव !

१. यजमानांच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी झाल्याने त्यांच्या पायांत तीव्र वेदना होणे आणि ‘सी.टी. स्कॅन’ तपासणी केल्यावर ‘यजमानांच्या पायाचे शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगून आधुनिक वैद्यांनी त्यांच्या चाचण्या करायला सांगणे

‘माझ्या यजमानांच्या पायाच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी अडकल्याने रक्तप्रवाहात अडथळा येऊन त्यांचा उजवा पाय सतत दुखायचा. त्यांना होणार्‍या वेदनांची तीव्रता एवढी अधिक होती की, पाय नुसता टेकला, तरी खिळे टोचल्यासारखे दुखायचे. त्यामुळे मार्च २०१८ मध्ये त्यांची ‘सी.टी. स्कॅन’ ही तपासणी करण्यात आली. ही तपासणी केल्यावर ‘यजमानांच्या पायाचे शस्त्रकर्म करावे लागेल’, असे तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले आणि अनेक प्रकारच्या चाचण्या करायला सांगितल्या. त्याप्रमाणे यजमानांनी सर्व चाचण्या करून घेतल्या.

२. एका नावाजलेल्या रुग्णालयात गेल्यावर आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानुसार यजमानांच्या सर्व चाचण्या करून घ्याव्या लागणे, नंतर शस्त्रकर्म तज्ञांनी शस्त्रकर्माचा दिनांक निश्‍चित करून पहिल्या चाचण्यांवर विश्‍वास नसल्याचे सांगून पुन्हा चाचण्या करायला लावणे

नंतर यजमानांना एका नावाजलेल्या रुग्णालयात दाखवले. तेव्हा तपासणी करणार्‍या आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला येथे पुन्हा सर्व चाचण्या कराव्या लागतील.’’ त्याप्रमाणे यजमानांनी पुन्हा सर्व चाचण्या करून घेतल्या. नंतर त्या रुग्णालयातील शस्त्रकर्म करणार्‍या डॉक्टरांनी शस्त्रकर्माचा दिनांक निश्‍चित केला आणि यजमानांना आदल्या दिवशी रुग्णालयात भरती व्हायला सांगितले. त्या वेळी शस्त्रकर्म करणार्‍या डॉक्टरांनी यजमानांना पुन्हा सर्व चाचण्या करायला सांगितल्या. तेव्हा यजमानांनी त्यांना सांगितले, ‘‘कालच तुमच्या रुग्णालयात चाचण्या करून घेतल्या आहेत.’’ यावर ते म्हणाले, ‘‘आमचा त्यावर विश्‍वास नाही. तुम्ही पुन्हा चाचण्या करा.’’ नाईलाज झाल्याने आम्ही पुन्हा सर्व चाचण्या केल्या आणि त्यानंतर यजमानांच्या उजव्या पायाचे शस्त्रकर्म झाले.

यजमान आता पूर्ण स्वावलंबी झाले आहेत. ही सर्व श्री गुरु, श्रीकृष्ण आणि श्री गणेश यांचीच कृपा आहे.’

– एक साधिका (१८.३.२०१९)

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मोहीम !

वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात काही अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी आम्हाला त्वरित कळवा.

चांगले आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना नम्र विनंती !

पैसे लुबाडणार्‍या आधुनिक वैद्यांची नावे उघड करण्यासाठी कृपया साहाय्य करा. ही तुमची साधना असेल. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल.

आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now