सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर महिला कर्मचार्‍याकडून लैंगिक छळाचा आरोप

महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याने मला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे ! – न्या. गोगोई यांचा आरोप

  • देशाच्या सरन्यायाधिशांवरच असा आरोप झाल्यावर ‘मी टू’ या महिलांवर लैंगिक शोषणाच्या आंदोलनावरून आवाज उठवणार्‍या सर्व महिला अद्याप गप्प का ?
  • महिला मानवाधिकार आयोग यावर का बोलत नाही ?
  • हिंदूंच्या संतांवर आरोप झाल्यावर त्यांची वाट्टेल तशी अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे आता गप्प का ?
  • या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनकर्त्यांनी या प्रकरणातील सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

नवी देहली – देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातील ३५ वर्षीय ‘ज्युनियर कोर्ट असिस्टंट’ असणार्‍या एका महिला कर्मचार्‍याने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. सध्या संबंधित महिला सर्वोच्च न्यायालयात कार्यरत नाही. महिलेने न्यायालयात यासंदर्भात तक्रार दिली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अरुण मिश्रा आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपिठासमोरच या तक्रारीची २० एप्रिलला सकाळी तातडीने सुनावणी झाली. (‘ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, तेच या आरोपांची सुनावणी कशी करू शकतात ? उलट गोगोई यांनी स्वतःहून अन्य न्यायाधिशांना सुनावणी करायला सांगायला हवे होते किंवा यावर ते स्वतः निरपराध ठरेपर्यंत कोणत्याही खटल्याची सुनावणी करणार नाही किंवा पदाचे त्यागपत्र द्यायला हवे होते ! असा आरोप मंत्री, खेळाडू, अभिनेते, आदींवर झाल्यावर त्यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले जाते, निलंबित केले जाते किंवा त्यांना चित्रपटांतून काढून टाकले जाते, तसाच प्रकार न्यायाधिशांविषयी व्हायला हवा’, असे सामान्य जनतेला वाटते ! – संपादक)

१. त्या वेळी न्या. गोगोई यांनी म्हटले, ‘२० वर्षे न्यायपालिकेत नि:स्वार्थ सेवा केल्यानंतर माझ्या बँकेत ६ लाख ८० सहस्र रुपये जमा आहेत. भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात ४० लाख रुपये आहेत. (याचा आाणि आरोपाचा काय संबंध ? हा लैंगिक शोषणाचा आरोप आहे, भ्रष्टाचाराचा नाही ! – संपादक)

२. काही शक्तींना माझ्याविरोधात काहीच मिळत नसल्याने त्यांनी आता एका महिलेचा आधार घेत माझ्यावर आरोप केले. (हे आरोप खरे आहेत कि खोटे याचे अन्वेषण करण्यासाठी सीबीआयच्या विशेष अन्वेषण पथकाच्या स्थापनेचा आदेश न्यायालय का देत नाही ? आरोप झाल्यावर प्रत्येक व्यक्ती ते नाकारण्याचा प्रयत्न करतो; मात्र अन्वेषण आणि न्यायालय यात त्याचे खरे आणि खोटे हे सिद्ध होत असते ! – संपादक)

३. येत्या काही आठवड्यांमध्ये मी काही महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणार आहे. त्यामुळेच मला अडकवले जात आहे.

४. ‘या आरोपांना उत्तर देण्यासाठी मला १० घंट्यांहूनही अल्प वेळ देण्यात आला आहे’, असे सरन्यायाधीश म्हणाले. या वेळी सरन्यायाधिशांनी निर्णय देणे टाळले, तर न्यायमूर्ती मिश्रा आणि न्यायमूर्ती खन्ना यांनी ‘माध्यमांनी दायित्वाने वागावेे. सत्यतेची पडताळणी केल्याविना माध्यमांनी महिलेच्या आरोपांना प्रसिद्धी देऊ नये. महिलेच्या आरोपांची शहानिशा न करता बातम्या देण्यामुळे न्याययंत्रणेचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते’, असे म्हटले. (सरन्यायाधिशांच्या संदर्भात आरोप झाल्यावर न्यायालय माध्यमांना असे सांगते; मात्र हिंदूंच्या संतांवर झालेल्या अशा प्रकारच्या आरोपांविषयी कधीही असे म्हणत नाही, तेव्हा माध्यमे संतांची नको तितकी अपकीर्ती करतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! – संपादक)

५. सुनावणीच्या वेळी सरन्यायाधिशांनी सांगितले की, लैंगिक छळाचे आरोप करणारी महिलाच ४ दिवस कारागृहात होती आणि तिची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे. तसेच तिला पोलिसांनीही तंबी दिली होती. (ज्या व्यक्तीवर आरोप आहे, तिने आरोप करणार्‍या महिलेच्या अन्य कोणत्याही गोष्टींवर बोट दाखवण्याऐवजी स्वत:वर झालेल्या आरोपांविषयी बोलले पाहिजे ! एखादी व्यक्ती गुन्हेगार असली, तरी तिचे कोणी लैंगिक शोषण केले म्हणजे ते चालू शकते, असे कसे म्हणता येईल ? – संपादक)

६. सर्वोच्च न्यायालयाचे सरचिटणीस संजीव सुधाकर कलगावकर यांनी सांगितले की, या महिलेने केलेले सर्व आरोप अपकीर्ती करणारे आणि बिनबुडाचे आहेत. यावर सुनावणी चालू आहे. सरन्यायाधिशांवर आरोप करणारे पत्र या महिलेने अनेक न्यायाधिशांना पाठवले आहे. (न्यायालयात आरोप सिद्ध किंवा फेटाळले जाण्यापूर्वीच न्यायालयाचेच सरचिटणीस असे विधान कसे करू शकतात ? – संपादक)

७. या महिलेने ऑक्टोबर २०१८ मध्ये घडलेल्या २ प्रसंगांचा उल्लेख करणारे एक प्रतिज्ञापत्र सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवासस्थानी पाठवले होते. या प्रतिज्ञापत्रासमवेत तिने पुराव्यादाखल काही व्हिडिओही पाठवले आहेत.

८. या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, वर्ष २०१८ च्या ऑक्टोबर मासामध्ये रंजन गोगोई हे सरन्यायाधीश पदावर नियुक्त झाले. त्यानंतर त्यांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. एका प्रसंगामध्ये गोगोई यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे तिने म्हटले आहे. गोगोई यांची मागणी फेटाळून लावल्याने गोगोई यांनी महिला आणि तिच्या कुटुंबाला सातत्याने त्रास द्यायला प्रारंभ केला. तिच्या काम करण्याच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले गेले आणि नोकरीतून काढून टाकण्याची धमकीही तिला देण्यात आली. (अनेकदा कामाच्या ठिकाणी दोघांच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवले जातात. यात दोघांचाही कोणतातरी देवाणघेवाणीचा संबंध असू शकतो; मात्र त्यांच्यात वाद झाल्यास ते नंतर एकमेकांना त्रास देण्यासाठी किंवा सूड घेण्यासाठी महिला लैंगिक शोषणाचे आरोप करते, तर पुरुष तिला अन्य मार्गांनी त्रास देतो, असे अनेक प्रसंगात घडल्याचे समोर आले आहे ! – संपादक)

९. राहुल गांधी यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यावरील चित्रपट, तमिळनाडूमध्ये निवडणुकीच्या वेळी झालेला भ्रष्टाचार या प्रकरणांवर पुढच्या आठवड्यात सरन्यायाधीश गोगोई सुनावणी करणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF