हेमंत करकरे हे राष्ट्रावरील कलंक असून त्यांचे अशोकचक्र परत घ्यावे !  अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना

प्रत्येक राष्ट्र आणि धर्म प्रेमीने साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावरील अनन्वित अत्याचारांची निंदा करावी !

मुंबई, २० एप्रिल (वार्ता.) – एका हिंदु साध्वी संन्यासी स्त्रीला २४ दिवस पट्ट्याने मारहाण केली, त्यांना अश्‍लील ध्वनीचित्रफिती दाखवल्या गेल्या, त्यांच्या अंगावरील भगवी वस्त्रे उतरवली. साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांनी जे अत्याचार केले, त्या अधिकार्‍यासाठी ‘हुतात्मा’ या शब्दाचा उपयोग करू नये. असे करकरे हे राष्ट्रावरील कलंक असून त्यांचे अशोकचक्र परत घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष श्री. अजयसिंह सेंगर यांनी २० एप्रिल या दिवशी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. (श्री. अजयसिंह सेंगर यांनी कठोर शब्दांचा उपयोग केला असला, तरी त्यांनी मांडलेली वस्तूस्थिती नाकारता येत नाही. असाच अत्याचार कुणा अल्पसंख्यांकावर झाला असता, तर मानवाधिकार आयोग, पुरो(अधो)गामी मंडळी आणि धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवणारे यांनी आकाश-पाताळ एक केले असते. त्या वेळी सर्व मूग गिळून गप्प होते; मात्र साध्वी प्रज्ञासिंह यांनी त्यांच्यावरील अत्याचारांची तीव्रता व्यक्त केल्यावर त्यांना आतंकवादी ठरवण्यात येत आहे. श्री. सेंगर यांच्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्यक्तीला साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावरील अत्याचारांची निंदा करावीशी वाटल्यास चूक ते काय !  संपादक)

या प्रसिद्धीपत्रकात श्री. अजयसिंह सेंगर यांनी पुढे म्हटले आहे की, साध्वी प्रज्ञासिंह यांची ३ वेळा नार्को टेस्ट, ३ वेळा ब्रेन मॅपिंग करण्यात आले, तरी सुद्धा काहीच सिद्ध झाले नाही. इतक्या भयानक प्रकारे त्यांना मारहाण केली की, त्यांना आता चालताही येत नाही. भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा उभा केला. हिंदु आतकंवादी म्हणून हिणवण्यात आले. साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयी कोणताही पुरावा नसतांना ९ वर्षे त्यांनी हा अत्याचार सहन केला. त्या वेळी करकरे यांना कुणी विचारले नाही की, असे का केले ? विचार करा, जर तुमच्या घरातील कुठल्या स्त्रीचा असा छळ झाला असता, तर ज्याने छळ केला, त्याविषयी तुमची काय भावना असती ? तीच भावना आज साध्वी प्रज्ञासिंह यांची आहे. त्यांच्यावरील अन्याय व्यक्त करण्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. ज्या पोलीस अधिकार्‍यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना मारहाण केली, त्यांना कारागृहात टाकावे.


Multi Language |Offline reading | PDF