साध्वी प्रज्ञासिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

साध्वी प्रज्ञासिंह यांनी करकरेंविषयी केलेल्या विधानाचे प्रकरण

मुंबई – साध्वी प्रज्ञासिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे. ज्या प्रकारे एका महिलेला यातना देण्यात आल्या, तिची प्रतारणा करण्यात आली, ते कोणत्याही कायद्यात बसत नाही. साध्वींची भावना, पिडा तुम्ही समजून घ्यायला हवी. साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मालेगाव स्फोटाची किंमत चुकवावी लागली, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ‘आतंकवाद्यांनी जेव्हा करकरेंना ठार केले तेव्हा, माझे सुतक संपले’, असे साध्वी म्हणाल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

‘व्यक्तीगत त्रास झाल्यामुळे प्रज्ञासिंह तसे बोलल्या’, असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF