(म्हणे) ‘नथुराम गोडसे जिवंत असता, तर भाजपने त्यालाही उमेदवारी दिली असती !’  सचिन सावंत, सरचिटणीस, काँग्रेस

गांधीवधाची आतंकवादाशी तुलना करणारे देशातील इस्लामी आतंकवादाविषयी तोंडातून शब्दही काढत नाहीत ! ही काँग्रेसच्या नेत्यांची दांभिकता ओळखा !

मुंबई   प्रज्ञासिंह हिला दिलेल्या उमेदवारीवरून हे स्पष्ट होते की, आतंकवादाला छुपे समर्थन हा भाजपच्या कार्यपद्धतीचाच भाग आहे. प्रज्ञासिंह हिला न्यायालयात झालेले साहाय्य आणि सनातनवर कारवाई करण्यातील बोटचेपे धोरण हे भाजपची विचारधारा दर्शवते. हे सर्व पहाता नथुराम गोडसे जर जिवंत असता, तर त्यालाही भाजपची उमेदवारी मिळाली असती, असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. (साध्वी प्रज्ञासिंह यांना न्यायालयाने अद्याप दोषी ठरवलेले नाही. संविधानाच्या गप्पा मारणारे कसे स्वत:च्या सोयीनुसार त्याचा उपयोग करतात, हेच यातून दिसून येते. एका साध्वीचा एकेरी नावाने उल्लेख करणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती काय आहे, ते यातून दिसून येते.  संपादक) या वेळी सावंत म्हणाले, ‘‘भविष्यात भाजपने डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या करणार्‍यांनाही उमेदवारी दिल्याचे दिसून येईल.’’  (पुरोगामी मंडळींच्या हत्येचे अन्वेषण अद्यापही पूर्ण झालेले नसतांना ‘त्यांची हत्या हिंदुत्वनिष्ठांनीच केली आहे’, असे ठरवून त्यांना दोषी ठरवण्याचा अधिकार सावंत यांना कुणी दिला ?  संपादक)

या वेळी सचिन सावंत म्हणाले, ‘‘प्रज्ञा ठाकूर हिच्यावर असलेले गुन्हे पहाता एवढ्या मोठ्या आरोपातून सुटका होऊ शकत नाही. आतंकवादाचे गंभीर गुन्हे ज्या व्यक्तीवर आहेत, तिच्या उमेदवारीचे भाजप निर्लज्जपणे समर्थन करत आहे. भाजपने तिच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. प्रज्ञा ठाकूर हिची हकालपट्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची क्षमा मागितल्याविना या पापातून भाजपची मुक्तता होणार नाही.’’ (भाजपला आतंकवादाचे समर्थक म्हणणार्‍या काँग्रेसमधील अनेक नेत्यांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांच्या पतीवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाराष्ट्रातही आदर्श घोटाळा करणारे नेते अजूनही काँग्रेसच्या नेतेपदी आहेत. अन्यांवर टीका करण्यापूर्वी काँग्रेसने याविषयी लाज बाळगावी.  संपादक)

(म्हणे) ‘दाभोलकरांच्या मारेकर्‍यांनाही भाजपने उमेदवारी दिली असती !’ – अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने हत्येचा आरोप असलेले पद्मसिंह पाटील यांना जवळ केले, कोट्यवधी रुपयांचा जलसिंचन घोटाळा केल्याचा आरोप असणारे स्वतः अजित पवार यांना पाठीशी घालून नेतेपदी टिकवून ठेवले, हत्येचा आणि फसवणुकीचा आरोप असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक मानकर यांना सामावून घेतले, त्या (अ)राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप सिद्ध झालेले नसतांनाही साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर टीका करणे हास्यास्पद होय !

पुणे – साध्वी प्रज्ञासिंह यांनी आतंकवादविरोधी पथकाचे दिवंगत प्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी जे विधान केले, त्याविषयी भाजपकडून कोणी बोलण्यास सिद्ध नाही. डॉ. दाभोलकर, कलबुर्गी यांचे मारेकरी सापडले असते, तर भाजपने त्यांनाही उमेदवारी दिली असती, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF