माझा छळ केल्याप्रकरणी क्षमा मागणार का ? – साध्वी प्रज्ञासिंह यांचा प्रश्‍न

हेमंत करकरे यांच्या कथित अवमानावरून साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर टीका करणारे; मात्र साध्वींवर झालेल्या अत्याचाराविषयी मौन बाळगून आहेत, हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. न्यायालयाने साध्वी यांना दोषी ठरवले नसतांना त्यांना आतंकवादी म्हणणारे कायदाद्रोहीच होत !

भोपाळ (मध्यप्रदेश) – तुम्हाला कधी १५-२० पुरुषांनी पट्ट्याने मारले आहे का ? नग्न करून उलटे लटकवले आहे का ? हे कोणत्या कायद्यात बसते ? आतंकवाद्यांच्या गोळीने कोणी मेले, तर त्याला हुतात्म्याचा दर्जा मिळतो; म्हणून मी क्षमा मागितली; मात्र ज्यांनी माझा ९ वर्षे छळ केला त्यांना तुम्ही माझी क्षमा मागण्यास सांगू शकता का ?, असा प्रश्‍न येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी २० एप्रिलला सकाळी पत्रकार परिषद घेऊन विचारला.

‘हेमंत करकरे यांना शाप दिल्याने त्यांचा अंत झाला’, अशा आशयाचे त्यांनी वक्तव्य केल्यावर त्याच्यावर वाद झाला होता. त्यानंतर या विधानाविषयी साध्वी प्रज्ञासिंह यांनी १९ एप्रिलला रात्री क्षमा मागितली होती. त्यानंतर २० एप्रिलला सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि वरील प्रश्‍न विचारला. निवडणूक आयोगाने या विधानावरून साध्वी प्रज्ञासिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now