‘कोणतेही बटण दाबले, तरी भाजपला मतदान होते’, या आरोपामध्ये तथ्य नाही ! – निवडणूक अधिकारी डॉ. भोसले

यावरून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांकडून लोकांची दिशाभूल झाली, असा याचा अर्थ घ्यावा का ?

सोलापूर, २० एप्रिल (वार्ता.) – सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्व मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५८.४५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ‘काही उमेदवारांनी मतदान यंत्रामध्ये बिघाड असून सर्व मते एका विशिष्ट उमेदवाराला मिळतात’, अशी तक्रार माध्यमांसमोर केली होती. याविषयी संबंधित मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे निश्‍चिती केली असता प्रत्यक्षात मतदाराने अशी कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही, त्यामुळे यामध्ये काही तथ्य नाही, असे डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF