साधकांनो, ‘सनातन प्रभात’मधील लिखाणावर, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर टीका करणार्‍या तथाकथित हिंदुत्ववाद्यांपासून दूर रहा !

‘सनातन प्रभात’मधून सतत समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या दृष्टीने परखडपणे लिखाण केले जाते. हिंदु धर्माच्या हानीच्या संदर्भात जागृती करतांना सर्व राजकीय पक्षांवर टीकाही करण्यात येते. ‘सनातन प्रभात’मधून टीका करण्याचा उद्देश ‘आदर्श राष्ट्रउभारणीसाठी तत्त्वनिष्ठ विचार देणे’, हा असतो. तथापि तत्त्वनिष्ठ हिंदुत्वापेक्षा पक्षनिष्ठ हिंदुत्ववादी असलेले काही जण या लिखाणामागील कारणमीमांसा समजून न घेता ‘सनातन प्रभात’ कुठल्या तरी एखाद्या पक्षाच्या विरोधात असल्याचे सांगतात. ‘असे पक्षनिष्ठ हिंदुत्ववादी हे धर्मसंस्थापनेचे महान कार्य करण्यास अपात्र आहेत’, असे समजून साधकांनी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ देऊ नये. तसेच अशांना निःशुल्क ‘सनातन प्रभात’ही चालू ठेवू नये.

काही तथाकथित हिंदुत्ववादी ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतारी पुरुष कसे आहेत ?’ असा अनाठायी प्रश्‍न विचारतात. प्रत्यक्षात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीही स्वतःला ‘अवतारी पुरुष’ म्हटलेले नाही. ते म्हणतात, ‘अवतारांना आजारपण आणि म्हातारपण कुठे असते ?’ या संदर्भात अनेक दृष्टीकोन ‘सनातन प्रभात’मध्ये वेळोवेळी प्रकाशित झाले आहेत. तथापि या संदर्भात शंका-कुशंका निर्माण करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात विकल्प पसरवणार्‍यांशी चर्चा करण्यात वेळ न घालवता साधकांनी त्यांच्यापासून लांबच रहाणे योग्य ठरेल.’


Multi Language |Offline reading | PDF