रामनाथी आश्रमदर्शन केलेले जिज्ञासू आणि सनातनचे हितचिंतक यांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !

१. ‘मला ‘आपले घरही रामनाथी येथील सनातन आश्रमाप्रमाणे व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवावे’, असे वाटले.

२. प.पू. गुरुदेवांवर पुष्पवृष्टी झालेल्या कक्षात गेल्यावर मला ‘कोणत्या तरी सात्त्विक लोकात गेले आहे’, असे वाटत होते. तेथे आणि ध्यानमंदिरात गेल्यावर मला पुष्कळ आनंद जाणवत होता. दोन्ही कक्षांतून बाहेर पडण्यास माझे मन सिद्धच होत नव्हते.

३. ‘इथे केवळ भगवंताचे अस्तित्व कार्य करत आहे आणि या आश्रमात केवळ देवदेवताच वास करत आहेत’, असे मला जाणवले.

४. ‘कामधेनुमाता अवतार घेऊन भूमीवर आली, तर ती रामनाथी आश्रमातच येईल’, असे मला वाटले.’

– श्री. बालसुब्रमणी, शिवमोग्गा, कर्नाटक. (११.६.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF