‘रंगपंचमीच्या दिवशी स्वतः समवेत कोणी खेळायला नसल्याने वाईट वाटणे आणि देवाने रंगपंचमीचा भावार्थ सांगितल्यावर आनंद होणे’, याविषयी आंध्रप्रदेशातील कु. कनकमहालक्ष्मी देवकर यांना आलेली अनुभूती

‘फाल्गुन कृष्ण पक्ष पंचमी, म्हणजे रंगपंचमी (२६.३.२०१९) या दिवशी माझ्या समवेत रंगाने खेळायला कोणीही नसल्याने मला वाईट वाटले. त्या वेळी माझे देवाशी पुढील संभाषण झाले.

मी : अरे देवा, या वर्षीपण माझ्या समवेत कुणी नाही रंगपंचमी खेळायला !

देव (मानवी भाषेत) : अगं, रंगपंचमीचा अर्थ काय सांग बघू ?

मी : खेळल्याने आनंद मिळतो ना !

देव : इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात ?

मी : सात

देव : आपल्या शरिरात किती चक्रे असतात ?

मी : सात (‘एका मतानुसार ‘सहस्रारचक्र’ हे कुंडलिनीशक्तीचे द्वार आहे. त्यामुळे काही जण शरिरात, म्हणजे कुंडलिनीमध्ये षट्चक्रे असल्याचे मानतात.’ – संकलक)

देव : एक-एक रंगाने एक-एक चक्र रंगून भगवंताशी रंगणे, हीच तर खरी होळी आहे. (‘साधना करतांना कुंडलिनीतील मूलाधार, स्वाधिष्ठान….. अशा प्रकारे एक-एक चक्रातून पुढचा पुढचा आध्यात्मिक प्रवास करत भगवंताशी एकरूप होणे, हाच होळी खेळण्यामागील भावार्थ आहे.’ – संकलक) 

मी : किती छान !

देव : मग आता कसे करणार ?

मी : हो ! तुझ्यात रंगून जाईन. (भगवंताच्या प्राप्तीसाठी साधना करण्यात रंगून जाईन.)

‘देवा, रंगपंचमीच्या दिवशी मला तुझ्या कृपेमुळे तुझ्या अनुसंधानात राहून रंगपंचमी साजरी करण्यामागील भावार्थ कळला. यासाठी तुझ्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे. देवा, ‘आता तूच माझ्यातील प्रत्येक स्वभावदोषाचे निर्मूलन करून मला तुझ्या रंगात (साधनेत) रंगवून घे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. कनकमहालक्ष्मी देवकर, अनकापल्ली, विशाखापट्टणम्, आंध्रप्रदेश. (२६.३.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now