जिहादी आतंकवाद्यांकडून आता काश्मीरमध्ये चिनी ग्रेनेडचा वापर

सर्वच गोष्टींत आता पाकचे चिनीकरण झाले आहे ! उद्या पाकिस्तान चीनचा अधिकृत भाग घोषित झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! त्यापूर्वीच भारताने पाकमधील आतंकवादी आणि भारतद्वेषी सैन्य अन् नेते यांना धडा शिकवून पाक पुन्हा भारताला जोडण्यासाठी प्रयत्न करायला हवा !

नवी देहली – पाकिस्तान काश्मीरमधील आतंकवाद्यांना चिनी ग्रेेनेड पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. १ जानेवारी २०१८ पासून आतापर्यंत सुरक्षादलांनी आतंकवाद्यांकडून ७० चिनी ग्रेनेड जप्त केले आहेत. याव्यतिरिक्त पाकने आतंकवाद्यांना चीननिर्मित पिस्तूल, कवचभेद करणारे तोफगोळे आणि काडतुसे पुरवली आहेत. यामुळे आतंकवाद्यांकडून सुरक्षादलांवर ग्रेनेडने आक्रमण करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यांनी बंकर्स, गस्तीपथक, वाहने आणि सुरक्षादलांचे तळ यांवर हे ग्रेनेड फेकले आहेत.

यापूर्वी आतंकवाद्यांकडून पाकिस्ताननिर्मित ग्रेनेडचा वापर केला जात होता. या ग्रेनेडवर पाकची माहिती असायची. आता चिनी ग्रेनेडचा वापर केला जातो, ज्यावर कोणतीही माहिती नसते. चिनी ग्रेनेडची तीव्रता अल्प असते; मात्र ते गोळ्यांच्या तुलनेत अधिक हानी पोचवतात. आतंकवाद्यांनी पाकची शस्त्रे वापरल्यास त्याचे नाव समोर येणार. असे होऊ नये; म्हणून आतंकवादी चिनी शस्त्रांचा वापर आता करत आहेत. चिनी ग्रेनेड वापरणे सोपे असून त्यासाठी विशेष प्रशिक्षणाचीही आवश्यकता भासत नाही.


Multi Language |Offline reading | PDF