आदिवासी शाळेतील मुलींवर अत्याचार करणार्‍यांना फाशी द्या !

कोळसेवाडी (कल्याण) येथेही स्थानिक आदिवासी महिला मंडळाची मागणी

कल्याण – राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथील ख्रिस्ती शाळेच्या वसतीगृहात विद्यार्थिनींवर अत्याचार करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असे निवेदन आदिवासी परधान महिला विकास मंडळ यांच्या वतीने कोळसेवाडी पोलिसांना १७ एप्रिलला देण्यात आले. मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा वंदना कुडमते यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी समाजाच्या अस्मितेला धोका निर्माण झाला असून प्रतिदिन काही ना काही नवनवीन संकटांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षण विस्तार अधिकारी, निरीक्षक यांनी आपली कर्तव्ये पार पाडली आहेत का, याचीसुद्धा चौकशी करण्यात यावी.


Multi Language |Offline reading | PDF