राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथे ‘इन्फंट जीजस पब्लिक स्कूल’च्या वसतीगृहात विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार !

दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यपालांना निवेदन

दया, क्षमा आणि शांतीचा संदेश देणार्‍या ख्रिस्त्यांच्या शाळेतील भयानक वास्तव ! वासनांध कर्मचार्‍यांचा भरणा असलेल्या अशा ख्रिस्ती संस्थांवर कायमस्वरूपी बंदी घालून संबंधितांना कठोर शिक्षाच करायला हवी !

यवतमाळ, १९ एप्रिल (वार्ता.) – राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथील ‘इन्फंट जीजस पब्लिक स्कूल’च्या वसतीगृहातील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी १८ एप्रिलला ‘ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन’च्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यपालांना निवेदन पाठवण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून येथील अल्पवयीन विद्यार्थिनींवर सातत्याने अत्याचार करण्यात आले आहेत. पीडित विद्यार्थिनींना जेवणातून गुंगीचे औषध देऊन तेथील कर्मचारी अमानवीय कृत्य करत होते.

या संदर्भात वसतीगृहाचे अधीक्षक छगन पचारे, नरेंद्र विरुटकर आणि वसतीगृहातील २ महिला कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे. ‘या संस्थेचे संस्थापक आणि इतर सर्व कर्मचारी यांची सखोल चौकशी करण्यात यावी’, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now