पाकमध्ये अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर यांच्याविरोधात लंडन येथे सिंधी संघटनेकडून आंदोलन

लंडनमध्ये आंदोलन होते; मात्र भारतात कोणीच काही करत नाही !

लंडन – पाकिस्तानच्या सिंधमध्ये २ अल्पवयीन हिंदु मुलींचे झालेले अपहरण, धर्मांतर आणि बलपूर्वक विवाह यांविरोधात लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय सिंधी महिला संघटनेच्या सिंधी महिलांनी पाकच्या उच्चायुक्तालयाबाहेर आंदोलन केले. या वेळी त्यांनी घोषणाबाजी केली. सिंधी हिंदूंना पाक सोडण्यासाठीच अशा प्रकारचे कृत्य केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

वर्ल्ड सिंध काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. रूबिना शेख म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये प्रशासन आणि संस्था जाणीवपूर्वक अल्पसंख्यांक, विशेषतः सिंधी हिंदूंच्या अधिकारांचे रक्षण करत नाहीत. पाकिस्तान सरकार एका धोरणानुसार देशामध्ये हिंसक धार्मिक कट्टरतावादाचे समर्थन करते. त्यामुळे कट्टरतावादी अशा प्रकारचे कृत्य करत आहेत. त्यांना सरकारचे संरक्षण मिळालेले आहे.


Multi Language |Offline reading | PDF