‘मेकर ग्रुप इंडिया’चा फसवणुकीचा गुन्हा राज्य गुन्हे अन्वेषणकडे द्या ! – ‘मेकर’च्या ठेवीदारांची पत्रकार परिषदेत मागणी

कोल्हापूर, १९ एप्रिल (वार्ता.) – ‘मेकर ग्रुप इंडिया’ आस्थापनाकडून ४५ सहस्र ठेवीदारांच्या ५६ कोटी ४४ लक्ष रुपयांच्या झालेल्या फसवणुकीविषयी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ८ डिसेंबर २०१८ या दिवशी रितसर गुन्हा नोंद झाला आहे. ‘नोंद झालेल्या गुन्ह्यानुसार आरोपींना अटक करून त्यांची मालमत्ता कह्यात घेण्यात येईल’, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले होते; मात्र गेल्या सहा मासांत एकाही आरोपीला अटक झाली नाही. अन्वेषणात कोणत्याही प्रकारची प्रगती नाही. पोलीस निष्क्रीय आहेत. त्यामुळे ‘मेकर ग्रुप इंडिया’चा फसवणुकीचा गुन्हा राज्य गुन्हे अन्वेषणकडे द्या, अशी मागणी मेकरच्या ठेवीदारांनी पत्रकार परिषदेत केली. ‘पोलीस आम्हाला न्याय देण्याऐवजी आमच्यावर दबाव आणत आहेत’, असाही आरोप ठेवीदारांनी या वेळी केला.


Multi Language |Offline reading | PDF