अमळनेरमध्ये (जिल्हा जळगाव) मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले !

पाडळसरे सिंचन प्रकल्प

जळगाव – तापी नदीवरील शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा प्रकल्प असलेल्या पाडळसरे सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या धरणाला निधी न दिल्याने पाडळसरे जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. या वेळी पोलिसांनी २७ आंदोलकांना अटक केली. येथील धरणाचे काम ठप्प आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.


Multi Language |Offline reading | PDF