महाराष्ट्रात कायद्याचे राज्यच अस्तित्वात नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – प्रत्येक इमारतीत समस्या आहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या गुंडांनी नागरिकांना वेठीस धरले आहे. प्रशासनही विकासकांच्या टोळ्यांच्या हाती असल्याचे दिसत असून मुंबईसह राज्यात कायद्याचे राज्यच अस्तित्वात नाही, अशी सद्यपरिस्थिती आहे, असे मत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी १८ एप्रिल या दिवशी मांडत राज्यातील अनधिकृत बांधकामांवर टिपणी केली.

पुण्यातील अनधिकृत महाविद्यालयावरील कारवाईप्रकरणी प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायमूर्ती म्हणाले, ‘‘देशात कोणीही अनधिकृत मंदिरे बांधू शकते, मशिदी बांधू शकते आणि सार्वजनिक ठिकाणांवर ही बांधकामे केली जातात; मात्र अशा बांधकामांमध्ये देव रहातो तरी कसा ? जर मला देव भेटला, तर मी त्याला ‘हे सगळे तुला चालते तरी कसे ? अशा अनधिकृत बांधकामांमध्ये तू रहातोस तरी कसा ?’, असे जरूर विचारणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF