‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्गा’तील युवकांना प्रतिदिन १ घंटा श्रीकृष्णाचा नामजप करण्यास सांगून पुढील वर्गात त्याविषयी आढावा घ्या !

प्रशिक्षणवर्ग सेवकांसाठी महत्त्वाची सूचना

‘प्रत्येक जिल्ह्यात युवकांसाठी साप्ताहिक ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग’ आयोजित केले जातात. यामुळे युवकांची शारीरिक क्षमता वाढण्यास साहाय्य होते. सध्या शारीरिक क्षमतेसह आध्यात्मिक बळ निर्माण होणे काळानुसार आवश्यक आहे. त्यामुळे प्रशिक्षणवर्ग सेवकांनी वर्गात उपस्थित युवकांना सध्या काळानुसार आवश्यक असलेला ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप प्रतिदिन १ घंटा करण्यास सांगावे.

नामजप करतांना आरंभी, प्रत्येक १५ मिनिटांनी आणि शेवटी पुढील प्रार्थना करण्यास सांगावे, ‘हे श्रीकृष्णा, राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यासाठी आम्हाला शारीरिक क्षमता, तसेच आध्यात्मिक बळ प्रदान कर. आमचे संख्याबळ आणि संघटितपणा वाढू दे. हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी, यासाठी आमच्याकडून तळमळीने प्रयत्न होऊ देत, अशी भावपूर्ण प्रार्थना आहे !’

‘सर्व युवकांनी प्रतिदिन नामजप केला का ?’, याचा आढावा वर्गसेवकांनी पुढील प्रशिक्षणवर्गात घ्यावा.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now