पाकिस्तानमध्ये हिंदु तरुणीचे अपहरण आणि धर्मांतर यांविरोधात निदर्शने

भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच पाक आणि अन्य इस्लामी देशांतील अशा घटना रोखण्यासाठी ठोस प्रयत्न होऊ शकतील !

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये ताहिर तामरी याने त्याचे वडील आणि भाऊ यांच्या साहाय्याने १७ वर्षांच्या नैना नावाच्या तरुणीचे अपहरण करून तिचे धर्मांतर केल्यानंतर तिच्याशी निकाह केल्याच्या प्रकरणी रहीम यार खान शहरामध्ये अल्पसंख्यांक हिंदूंंकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी येथील महामार्ग बंद करून मुलीला सुरक्षित परत सोपवण्याची मागणी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे केली. मुलीचे वडील रघुराम यांनी याविरोधात पोलिसांत तक्रार केल्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF