(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावावर देशाला हिंदु राष्ट्र करायचे आहे !’ – असदुद्दीन ओवैसी

  • हिंदु राष्ट्र हे प्रत्येक धर्मप्रेमी हिंदूचे ध्येय आहे !  
  • जगात १६७ ख्रिस्ती आणि ५७ हून अधिक इस्लामी राष्ट्र असतील, तर बहुसंख्य हिंदू असूनही भारत हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ?
  • ओवैसी यांना सर्व हिंदूंना १५ मिनिटांत मारून इस्लामी राष्ट्र करायचे आहे, त्याचे काय ? त्यामुळे त्यापूर्वी हिंदूंना हिंदु राष्ट्र करणे भागच आहे !

मुंबई, १९ एप्रिल (वार्ता.) – माझ्या राजकारणाचा हेतू देशात शरिया कायदा लागू करणे हा नाही. मोदी-शहा यांवर मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नियंत्रण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावावर या देशाला हिंदु राष्ट्र करायचे आहे, असे प्रतिपादन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले. संभाजीनगर येथे दैनिक ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले. (एकीकडे भारतात शरिया कायदा लागू करायचा नाही, असे म्हणायचे आणि दुसरीकडे तिहेरी तलाकचे समर्थन करायचे आणि हिंदूंना १५ मिनिटांत संपवू म्हणायचे, हा दुपट्टीपणा होय.  – संपादक)

या वेळी असदुद्दीन ओवैसी म्हणाले,

१. मोदी केवळ हिंदूंचे पंतप्रधान आहेत का ? तिहेरी तलाक आणि शबरीमाला या दोन्ही सूत्रांच्या केंद्रस्थानी महिला आहेत; मात्र तिहेरी तलाकधील पीडित महिलांविषयी धर्मनिरपेक्षपणे बोलले जाते आणि शबरीमालाचा विषय येतो तेव्हा श्रद्धा येते. माझीही श्रद्धा आहे ना, त्याचे काय ? (या देशात हिंदु बहुसंख्य असूनही हिंदूंच्या श्रद्धेला पायदळी तुडवले जाते. असे असूनही हिंदूंनी त्या विरोधात आवाज उठवू नये का ? आज बहुसंख्य असूनही हिंदूंची अशी अवस्था होत असेल, तर उद्या अल्पसंख्यांक झाल्यास काय होईल. या अगोदरच भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी सिद्ध व्हा ! – संपादक)

२. मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये ६ लोक मारले गेले, १०० हून अधिक घायाळ झाले. ज्यांच्यावर आतंकवादाचा आरोप आहे, त्यांच्यासाठी मोदी जाऊन प्रचार करतील. त्या जिंकल्या, तर त्यांना गृहमंत्रीही करू शकतील. (साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावरील आरोप सिद्ध झालेला नाही. एका बाजूला संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसर्‍या बाजूला साध्वी यांना न्यायालयाने दोषी ठरवण्यापूर्वीच त्यांना दोषी ठरवणे योग्य आहे का ? – संपादक)

३. माझ्या भाग्यनगर (हैद्राबाद) मध्ये मक्का मशीद भागातील स्फोटात ९ जण ठार झाले होते. (आतापर्यंत देशात इस्लामिक आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये शेकडो हिंदू मारले गेले, त्याविषयी बोलण्याचे धारिष्ट्य ओवैसी का दाखवत नाहीत ? – संपादक)

४. ‘हिंदू’ या वृत्तपत्रात सरसंघचालकांनी मुलाखतीत म्हटले होते की, जो ‘भारतमाता की जय’ ही घोषणा देणार नाही त्याला आम्ही भारतीय मानणार नाही. ‘अरे, तुम्ही कोण आहात बोलणारे ? ही काय राष्ट्रीयत्वाची चाचणी आहे का ?’(यात काय चुकीचे आहे. भारतात राहून या मातृभूमीला वंदन करायचे नाही, तर काय पाकिस्तानचा जयघोष करायचा का ? जे भारतात राहून भारतभूमीचा जयघोष करत नाहीत, त्यांनी हा देश सोडून खुशाल चालते व्हावे. – संपादक)

५. मूळ प्रवाहापासून बाजूला पडलेला समाज न्यायापासून वंचित आहे. त्यांच्यासाठी आम्ही सामाजिक, राजकीय मंच सिद्ध केला आहे. तो केवळ संसदीय निवडणुकीपुरता मर्यादित नाही. पुढेही कायम राहील. दोन भाऊ लहानपणी हरवले होते, आता ते एकत्र आले आहेत. (इस्लामनुसार मुसलमानेतरांना ‘काफिर’ समजले जाते, हे हिंदूंना माहीत नाही का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF