(म्हणे) ‘जराही लाज असेल, तर पंतप्रधान मोदींनी देशाची क्षमा मागावी’ ! – सचिन सावंत

काँग्रेसने आतापर्यंत केलेल्या शेकडो अपराधांविषयी, हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी रचलेल्या षड्यंत्राविषयी काँग्रेसनेच भारतियांची क्षमा मागायला हवी ! साध्वींनी जे भोगले, तेच त्यांच्या वक्तव्यातून उमटले ! साध्वींवर झालेल्या अनन्वित अत्याचारांविषयी काहीही न बोलणार्‍या काँग्रेसचे यातूनच खरे स्वरूप उघड होते !

मुंबई – आतंकवादी ते भाजप उमेदवार या प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रवासात भाजपचे मोठे योगदान राहिले आहे. भाजपचा खोटा राष्ट्रवाद आणि बेगडी देशप्रेमाचा बुरखा फाटला असून शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणार्‍या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देतांना भाजपला लाज कशी वाटत नाही ? जराही लाज असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची क्षमा मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. गांधीभवन येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 (म्हणे) ‘साध्वीच्या रूपाने भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे !’ – नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस

भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देऊन आतंकवादाला समर्थन दिले आहे. साध्वींच्या रूपाने भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजप आतंकवादाशी लढत असल्याचे ढोंग करत आहे. भाजपचा खरा चेहरा उघडा पडला आहे.(पाताळयंत्री, भ्रष्ट आणि सत्तालोलूप राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा गेली अनेक वर्षे जनता पहात आहे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now