(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांच्यामध्ये आतंकवाद किती मुरलेला आहे, हे यातून दिसते !’ – जयंत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

हिंदु आतंकवादाचे षड्यंत्र रचून समस्त हिंदूंचा आणि भारतियांचा अपमान करणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला साध्वींविषयी बोलण्याचा काय अधिकार ?

मुंबई, १९ एप्रिल – साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांना देशद्रोही असल्याचे म्हटले आहे. साध्वींमध्ये आतंकवाद किती मुरलेला आहे, हे दिसून येत आहे. त्यांनी हेमंत करकरे यांचाच नाही, तर संपूर्ण मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, भारतियांचा अपमान केलेला आहे. तुमचा एक उमेदवार हा शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्या मृत्यूविषयी आनंद व्यक्त करतोय. करकरे यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरणार्‍या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहसारख्या महिलेला लोकसभेसाठी उमेदवारी देणार्‍या भाजप सरकारला या देशात यापुढे कोणत्या प्रकारचे राजकारण करायचे आहे, हे स्पष्ट दिसते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF