बांगलादेशामध्ये लैंगिक शोषणाची तक्रार मागे न घेतल्याने विद्यार्थिनीला जिवंत जाळले

ढाका – येथून १६० किमी अंतरावर रहाणार्‍या एका १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांवर लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. ही तक्रार मागे न घेतल्यामुळे या मुलीला जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली आहे.

१. ही विद्यार्थिनी एका मदरशामध्ये शिकत होती. २७ मार्च या दिवशी मुख्याध्यपकांनी तिला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले आणि अयोग्य पद्धतीने तिला स्पर्श करण्यास चालू केल्यावर ती तेथून पळून गेली. तिने पालकांना ही घटना सांगितल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. यावरून पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटकही केली. त्या वेळी काही जण पोलीस ठाण्याच्या बाहेर राहून मुख्याध्यापकांना सोडण्याची मागणी करत होते.

२. ६ एप्रिल या दिवशी या विद्यार्थिनीला अन्य एका विद्यार्थिनीने खोटे सांगून एका इमारतीच्या गच्चीवर नेले तेथे बुरखा घालून असणार्‍या ४-५ जणांनी तिला मुख्याध्यापकांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यास सांगितले. तिने नकार दिल्यावर त्यांनी तेल ओतून तिला जाळले. यात तिचा उपचारांच्या वेळी मृत्यू झाला.

३. मृत्यूपूर्वी तिने पोलिसांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर १५ जणांना अटक करण्यात आली. यात मुख्याध्यपकांना सोडण्याची मागणी करणारे विद्यार्थीही आहेत. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पीडित मुलीच्या परिवाराची भेट घेऊन आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.


Multi Language |Offline reading | PDF