‘गंगा-जमुनी तहजीब (सभ्यता)’ म्हणजे नेमके काय ?

‘गंगा-जमुनी सभ्यता’ ही एक मोठी चर्चित सभ्यता आहे. ज्यांच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना मांडण्यात आली आहे, ते आधुनिक भारताचे पहिले धर्मनिरपेक्ष ठरले असतील. ती एक महामूर्ख व्यक्ती असेल. या सभ्यतेविषयी माझे मत विचारल्यास मी सांगीन, ‘आपल्या घरामध्ये अचानक ५ ते ७  बंदूकधारी दरोडेखोरांनी आक्रमण केले आहे. आपल्याला बेदम मारहाण केली आहे. त्यांनी घर पूर्णपणे लुटले आहे, बलात्कार केला आहे आणि आपल्या घराचा ताबा घेतला आहे. आता आपण आपल्याच घरात आश्रित ठरले आहोत.

वर्षे उलटली, दरोडेखोरांची नवी पिढी जन्माला आली. आपलीही नवी पिढी निर्माण झाली. पालटत्या काळासमवेत दरोडेखोरांनी थोडी तडजोड केली आणि आपण (हिंदूंनी) बर्‍याच गोष्टींचा त्याग केला. दोघेही एकत्र रहाण्यासाठी बद्ध झाले. काही प्रमाणात सांस्कृतिक आणि पारंपरिक देवाण-घेवाण करणे (हिंदूंना) भाग पडले. ही झाली ‘गंगा-जमुनी सभ्यता’ !

या सभ्यतेचे मूळ स्वरूप असे आहे की, आपण (हिंदूंनी) चादर चढवायची, ‘गरीब नवाज’समोर डोके टेकवायचे. सुफी संतांचा महिमा गायचा, कुठल्याही एका मकबर्‍याला भारतीय स्थापत्य आणि वास्तुकला यांची प्रतिनिधिक इमारत घोषित करायची, गजल ऐकायच्या, कव्वाली गायच्या; मात्र ते (मुसलमान) आपल्या संतांच्या आश्रमात चुकूनही जाणार नाहीत. हिंदूंची मंदिरे म्हणजे ‘नग्न मूर्तींचा सम्मुचय’ म्हणून त्यांची टिंगल करणार ! आपले धार्मिक ग्रंथ चुकूनही वाचणार नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीत चुकूनही ऐकणार नाही; मात्र ‘टाहो फोडून गायल्या जाणार्‍या पाकिस्तानी कव्वाली’ ऐकण्यात ते धन्यता मानणार ! दुसरीकडे ते छातीठोकपणे सांगणार ‘आम्ही भारतातील मुसलमान आहोत. आमची ओळख ‘गंगा-जमुनी सभ्यता’ आहे.’

ही सभ्यता खरेतर एक आभास आहे. या सभ्यतेला मान्यता तेव्हाच मिळेल, जेव्हा ते आदि शंकराचार्य यांच्यासह रामानुज, मध्वाचार्य, चैतन्य महाप्रभु, रामकृष्ण परमहंस यांच्या समोर डोके टेकवतील. मीर आणि गालिब यांच्यासमवेतच ते ‘रवींद्र’, ‘प्रसाद’, ‘निराला’ आणि ‘अज्ञेय’ यांचेही वाचन करतील. नाहीतर ही तुमची एकतर्फी सभ्यता तुम्ही खिशात सांभाळून ठेवा.’

संदर्भ : HindNews4u.wordpress.com

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now