(म्हणे) ‘भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पाहिल्यास डोळे फोडू, बोटे तोडू !’ – केंद्रीयमंत्री मनोज सिन्हा यांची धमकी

  • भारतीय सैनिकांकडे, नागरिकांकडे, महिलांकडे, हिंदूंकडे, हिंदु तरुणींकडे वाईट दृष्टीने पहाणार्‍यांवर कठोर कारवाई करू न शकणारे भाजपचे मंत्री स्वपक्षाच्या कार्यकर्त्याकडे कोणी अशा दृष्टीने पाहिल्यास धमकी देतात. यावरून त्यांची संकुचितता लक्षात येते !
  • काश्मीरमध्ये सैनिकांवर गेली काही वर्षे दगडफेक होत असतांना भाजप सरकार निष्क्रीय आहे, हे मनोज सिन्हा यांना दिसत नाही का ?
  • बंगाल आणि केरळ राज्यांमध्ये भाजप आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असतांना भाजप निष्क्रीयच आहे !  

गाझीपूर (उत्तरप्रदेश) – भाजपचे कार्यकर्ते गुन्हे आणि भ्रष्टाचार यांना मुळापासून उखडण्यासाठी सिद्ध आहेत. (गेल्या ५ वर्षांत भाजपच्या कार्यकर्त्यांनी असा किती भ्रष्टाचार दूर केला ? महाराष्ट्रात सिंचन घोटाळ्यातील अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. असे असतांना फुकाच्या गोष्टी करणारे भाजपचे मंत्री लोकांना मूर्ख बनवत आहेत ! – संपादक) जर त्यांच्यावर कोणीही बोट दाखवल्यास त्याचे बोट पुढील ४ घंट्यांत शिल्लक रहाणार नाही, याची ग्वाही देतो, असे विधान भाजपचे नेते आणि केंद्रीयमंत्री मनोज सिन्हा यांनी येथे एका प्रचारसभेत केले.

सिन्हा पुढे असेही म्हणाले की, ज्याची गाझीपूरची सीमा ओलांडण्याची लायकी नाही, अशा पूर्वांचलच्या एखाद्या गुन्हेगाराने (गाझीपूर मतदारसंघातून बसपचा उमेदवार उभा असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे प्रविष्ट आहेत.) येऊन कार्यकर्त्यांशी दृष्टी भिडवल्यास त्याचे डोळे शिल्लक रहाणार नाही. (राज्यात भाजपची सत्ता असतांना अशा गुन्हेगारांवर सरकार कारवाई का करत नाही, याचे उत्तर सिन्हा यांनी दिले पाहिजे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF