हरिद्वारसहित २४ रेल्वेस्थानकांवर आक्रमण करण्याची लष्कर-ए-तोयबाची धमकी

  • लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांच्याकडून घातपात करण्यापूर्वीच पाकमध्ये घुसून त्यांच्या आतंकवाद्यांना, प्रशिक्षण केंद्रांना भारताने नष्ट केले पाहिजे ! असे न करता भाजपचे शासनकर्ते घातपात होऊ शकणार्‍या ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था वाढवून गप्प बसतील, हे लक्षात घ्या !
  • भारतियांनी अशा धमक्यांच्या छायेखाली आणखी किती वर्षे जगायचे आहे ?

रुरकी (उत्तराखंड) – रुरकी, हरिद्वार या शहरांसहित देशातील २४ रेल्वेस्थानकांवर आक्रमण करण्याची धमकी लष्कर-ए-तोयबाने दिली आहे. या संदर्भातील एक पत्र तोयबाच्या कमांडरकडून रुरकी स्थानकाच्या अधीक्षकांना पाठवण्यात आले आहे. या २४ रेल्वेस्थानकांपैकी १० स्थानके उत्तराखंड येथील आहेत. त्यांना १० मे या दिवशी उडवण्यात येईल, असे यात म्हटले आहे. या पत्रानंतर येथील सुरक्षेत वाढ करून पत्राचे अन्वेषण करण्यात येत आहे.

जैश-ए-महंमदकडूनही धमकी

जयपूर – जैश-ए-महंमदने पंजाब आणि राजस्थान राज्यांतील काही रेल्वेस्थानके अन् काही धार्मिक स्थळे स्फोट घडवून उडवण्याची धमकी दिली आहे. जैश-ए-महंमदचा कमांडर मसूर अहमद याने फिरोजपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापनाला पत्र पाठवून धमकी दिली आहे. १३ आणि १६ मे या दिवशी हे स्फोट घडवण्यात येणार आहेत, असे यात म्हटले आहे. या पत्रानंतर दोन्ही राज्यांतील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF