भाजप हिंदुत्वनिष्ठ पक्ष नाही ! – मालेगाव स्फोटाच्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी

भाजपला याविषयी काय म्हणायचे आहे ?

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) – भाजप हिंदुत्वनिष्ठ पक्ष नाही. कोणत्याही दृष्टीने तो हिंदुत्वनिष्ठ नाही. भाजप धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. सर्व फसवणूक आहे. भ्रम पसरवला जात आहे. पुढच्या १० वर्षांत भाजप पूर्णपणे काँग्रेस होऊन जाईल. वर्ष २०१४ पासून आतापर्यंत त्याने हिंदुत्वाचे एकतरी काम केल्याचे तुम्ही सांगू शकता का ? भाजप केवळ मतपेढीचे राजकारण करत आहे, अशी कठोर टीका मालेगाव स्फोटाच्या प्रकरणात जामिनावर असलेले आरोपी आणि हिंदु महासभेकडून मिर्झापूर येथील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार सुधाकर चतुर्वेदी यांनी केली.

सुधाकर चतुर्वेदी यांनी मांडलेली सूत्रे

१. ‘भाजपमध्ये जाणार का ?’, असे विचारल्यावर चतुर्वेदी म्हणाले की, भाजपमध्ये जाण्याचा विचार वेळ आल्यावर पाहू; मात्र ते आम्हाला बोलावणार नाहीत. त्यांना आमची आवश्यकता नाही. आम्ही संघाचे प्रचारक आहोत. ते आम्हाला पचवू शकत नाहीत.

२. योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनवणे ही भाजपची आवश्यकता होती. भाजप स्वतःची पोळी भाजून घेत आहे. भाजप देश नाही, तर केवळ पक्ष चालवत आहे. त्याने पक्ष हा व्यापार बनवला आहे. भाजपने देशाला सोडून दिले आहे. देशाला देव चालवत आहे.


Multi Language |Offline reading | PDF