राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २०.४.२०१९ 

१२५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या नि जगात सर्वांत मोठी लोकशाही म्हणून मिरवणार्‍या भारतीय लोकशाहीचे धिंडवडे निघाले आहेत, असे कोणाला वाटल्यास त्यात वावगे वाटण्यासारखे काही नसावे. याचे कारण असे की, आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रात घसरण चालू आहे. दुसरीकडे बहुसंख्यांक असणार्‍या हिंदूंच्या देशात हिंदूंनाच सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. याची असंख्य उदाहरणे देता येतील. ही सर्व परिस्थिती लोकशाहीची निरर्थकताच स्पष्ट करते.

या एकूण परिस्थितीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासम आदर्श नि पितृवत् राज्यकर्त्यांच्या लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे. प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

हिंदूंच्या हत्या करणे आणि त्यांच्या बायकांचा उपभोग घेणे म्हणजे शरीयत कायद्याचे पालन !

‘वर्ष १९४७ पासून पाकिस्तानमध्ये शरीयत कायदा लागू झाल्यानंतर हिंदूंच्या धर्मांतराचे प्रमाण वाढत गेले. शरीयत कायद्यात, ‘काफिरांच्या बायका या उपभोग घेण्यासाठी गुलाम म्हणून वापराव्यात’, ‘जेव्हा मनात येईल, तेव्हा त्यांची मालमत्ता लुटावी’, ‘त्यास त्यांनी विरोध केला, तर त्यांची हत्या करावी’, असे सांगितले आहे. तेथील धर्मांध हे अल्पसंख्य हिंदूंशी वागतांना या शरीयत कायद्याचे ‘पालन’ करतात ! या धर्मांधांना तेथील पोलीस आणि न्यायालये हेही साथ देतात. अशा तेथील हिंदूंना कधी तरी न्याय मिळेल का ?’
(संदर्भ : विस्थापित पाकिस्तानी हिंदूंसाठी कार्यरत ‘निमित्तेकम’, या संघटनेकडून प्राप्त माहिती)

—————————————————————————————————————————————–

पोलिसांनो, जनतेवर अन्याय करत राहिल्यास शेवटी जनता तुमच्याहून ताकदवान होईल, हे विसरू नका !

‘खेड तालुक्यातील पिरलोटे येथे गोवंशियांच्या हत्याप्रकरणी ग्रामस्थांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. नि:शस्त्र नागरिकांवर पोलिसांनी दंडेलशाहीचा वापर करत लाठीमार केला. पोलिसांची या प्रकरणातील संशयित भूमिका आणि अक्षम्य दुर्लक्षपणा यांमुळेच लोटेमध्ये संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक झाला. याला केवळ पोलीस प्रशासनच उत्तरदायी असल्याचा आरोप येथील सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत करण्यात आला. पोलीस प्रशासनाने गोवंशियांच्या हत्येसंबंधित आरोपींना अटक करण्याची एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली.

—————————————————————————————————————————————–

‘पुरोगामित्वाच्या नावाखाली मनुस्मृति जाळणारे, जातीव्यवस्थेच्या विरोधात बोलणारेच आज जातीव्यवस्थेला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत !’ – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

‘हिंदू कधीही पोलीस किंवा सैन्य यांवर आक्रमण करत नाहीत. आज देशाची परिस्थिती एवढी भयावह झाली आहे की, भविष्यात जनता क्रांतीसाठी रस्त्यावर उतरल्याविना रहाणार नाही. ही संधी साधून जिहादी आतंकवादी आणि नक्षलवादी देशाची सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा गंभीर परिस्थितीत पोलीस आणि प्रशासन यांचे साहाय्य मिळाले नाही, तर हिंदूंना त्यांच्यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी हातात शस्त्र घेणे अपरिहार्य होईल.’

– अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद.

—————————————————————————————————————————————–

शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा अट्टाहास का ? ७०० वर्षांची धर्मपरंपरा मोठी कि ७० वर्षांचे कायदे ? धर्मशास्त्र हे ईश्‍वरनिर्मित, तर कायदे मानवनिर्मित आहेत. धर्मांतर्गंत असणारी मंदिरे कायद्याच्या अधीन नकोत ! मंदिरांविषयीचे निर्णय धर्माचार्य, संत यांनाच विचारून घ्यायला हवेत !  

—————————————————————————————————————————————–

‘जिजाऊंचे संस्कार आणि संतांचे मार्गदर्शन यांनुसार प्रजाहितदक्ष शासन केल्यामुळे छत्रपती शिवराय युगप्रवर्तक ठरले. गेल्या ७० वर्षांत त्यांच्यासारखा एकही प्रजाहितदक्ष राज्यकर्ता निर्माण झाला नाही. हे लोकशाहीचे अपयश आहे !’

–  श्री. मयूर तवटे, हिंदु जनजागृती समिती, सिंधुदुर्ग.


Multi Language |Offline reading | PDF