मुलांकडून धर्माचरण करवून घेणारी वाशी, नवी मुंबई येथील ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’ची शाळा !

१. मुलांकडून आरत्या म्हणवून घेणे

‘मी वाशी, नवी मुंबई येथील ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेत शिकत आहे. मी इयत्ता ४ थीत असतांना माझ्या वर्गशिक्षिका मुलांकडून प्रतिदिन २ आरत्या (गणपति आणि शिव यांच्या) म्हणवून घ्यायच्या.

२. मुलांकडून नामजप करवून घेणे

माझे मागच्या वर्षीचे वर्गशिक्षक श्री. काळेगुरुजी आम्हाला प्रतिदिन आपापल्या आवडत्या देवतेचा नामजप करण्यासाठी वेळ द्यायचे.

३. हिंदूंचे सण साजरे करणे

शाळेत सर्व हिंदु सणांची त्या त्या वेळी माहिती सांगितली जाते आणि सणही साजरे गेले जातात.

४. राष्ट्रीय आणि धार्मिक विषयांंवर आधारित स्पर्धा घेणे

माझ्या मित्रांच्या शाळांमध्ये केवळ स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन साजरे करतात; परंतु इतर स्पर्धा घेतल्या जात नाहीत. आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा, गीता श्‍लोक पठण, स्तोत्र पठण इत्यादी स्पर्धा घेतल्या जातात, तसेच मराठी राजभाषादिन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरे केले जातात.

५. आमच्या शाळेत एका शिक्षिकेने सर्व विद्यार्थ्यांचे ‘सैराटचा आदर्श घेऊ नये’, या संदर्भात प्रबोधन केले.’

– कु. हेरंब उदय धुरी (वय १२ वर्षे), सानपाडा केंद्र, नवी मुंबई. (२९.४.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF