प्रकाशझोतातील मासेमारीच्या विरोधात येत्या निवडणुकीनंतर तीव्र लढा उभारणार ! – नारायण राणे, खासदार

मालवण – प्रकाश झोतातील (एल्ईडीच्या) मासेमारीमुळे मासेमार बांधवांवर उपासमारीची पाळी आली आहे. एल्ईडीधारकांशी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे साटेलोटे असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे या मासेमारीच्या विरोधात येत्या निवडणुकीनंतर तीव्र लढा उभारणार असून त्याचे नेतृत्व मी करणार आहे. या आंदोलनापूर्वी शासनाने ‘एल्ईडी’ मासेमारीचा बंदोबस्त करावा अन्यथा माझ्याशी गाठ असेल, अशी चेतावणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी तालुक्यातील देवबाग येथे झालेल्या जाहीर सभेत दिला. देवबाग येथील महापुरुष रंगमंच येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग  लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली.

‘आमदाराने गेल्या ५ वर्षांत किती ठिकाणी बंधारे बांधले’, असा प्रश्‍न विचारत आमदार वैभव नाईक यांचे नाव न घेता राणे यांनी टीका केली. खासदाराला संसदेत बोलायला येत नाही. हेच खासदार उद्या बेकार होणार असून ते काय नोकर्‍या देणार, असा प्रश्‍न खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता राणे यांनी विचारला.


Multi Language |Offline reading | PDF