वयाच्या १८ व्या वर्षी मातृभूमीसाठी प्राणांचे बलीदान देणारे अनंत कान्हेरे !

१९ एप्रिल या दिवशी असलेल्या क्रांतीवीर अनंत कान्हेरे यांच्या बलीदान दिनानिमित्त…

नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर आणि ढोंगी अधिकारी होता. त्याने खरे अधिवक्ता, कीर्तनकार तांबेशास्त्री, बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना कारावासात धाडले होते. अशा अनेक कुकर्मांनीच जॅक्सनने आपला मृत्यूलेख लिहिला. या कामी नियतीनेच अनंतरावांची निवड केली. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी जॅक्सनच्या सन्मानार्थ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘किर्लोस्कर नाटक मंडळींचा शारदा’ नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. जॅक्सन दरवाजातून नाट्यगृहात प्रवेश करत असतांनाच आधीच येऊन बसलेल्या अनंतरावांनी जॅक्सनवर गोळी झाडली. ती त्याच्या काखेतून निघून गेली. चपळाई करून अनंतरावांनी जॅक्सनवर समोरून चार गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच कोसळला. अनंतराव शांतपणे पोलिसांच्या स्वाधीन झाले.

जॅक्सनवधाच्या आरोपाखाली अनंतराव आणि त्यांचे सहकारी अण्णा कर्वे अन् विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा झाली. १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या कारागृहात सकाळी  ७ वाजता हे ३ क्रांतीकारक धीरोदात्त वृत्तीने फाशी गेले. वयाच्या १८ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणार्‍या हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्यासारख्या अनेकांच्या बलीदानांमुळेच आज आपण स्वतंत्र आहोत.

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now