रामा, रामा रघुनंदना पुरुषोत्तमा ।

‘१०.४.२०१९ या दिवशी मी पुणे येथील तुळशीबागवाले राममंदिरात आईसमवेत ग्रंथ प्रदर्शन कक्षावर गेले होते. तुळशीबागवाले राममंदिर हे पुण्यातील पुरातन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. तिथे मला श्रीरामाचे अधिक अस्तित्व जाणवत होते. तेव्हा मला रामाविषयी अधिक भक्ती वाटू लागली आणि श्रीरामानेच मला पुढील कविता सुचवली.

कु. प्रार्थना पाठक

रामा, रामा रघुनंदना पुरुषोत्तमा ।
मी तुझ्या चरणांशी आले रे रघुनंदना ॥ १ ॥

माझ्यावर कृपा कर रे ।
रामा, रामा रघुनंदना ॥ २ ॥

रामा, रामा मी तुझी शबरी रे वाट पहाते ।
उष्टी बोरे खाण्या येरे ।
रामा येरे रामा रघुनंदना ॥ ३ ॥

रामराज्य आता परत येऊ दे ।
हिंदु राष्ट्राची पहाट होऊ दे ।
हीच प्रार्थना तुझ्या चरणा ॥ ४ ॥

येरे रामा येरे रामा ।
माझ्या रघुनंदना रामा ॥ ५ ॥’

– परात्पर गुरु डॉक्टर, श्रीकृष्ण आणि सद्गुरु स्वाती खाडये यांची,

कु. प्रार्थना महेश पाठक (वय ८ वर्षे), पुणे (१०.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF