शिवरायरूपी नरसिंहाने अफझलला अक्षरशः टरटरा फाडला होता ॥

मदमस्त गुर्मीत यवन अफझल । शिवाला संपवतो,
कडाडला होता ।
बड्या बेगमेने विश्‍वासाने ।
विडा देऊनी धाडला
होता ॥ १ ॥

हत्ती मरून अपशकुन जरी ।
अफझुलल्याला घडला होता ।
शिवद्वेषी विचारे तयाचा । मेंदू पक्का सडला होता ॥ २ ॥

चिरडून त्याच्या टाचेखाली ।
महाराष्ट्र सारा रडला होता । पाहूनी नंगा नाच त्याचा ।
जिजाऊचा छावा चिडला होता ॥ ३ ॥

आक्रोश मायभगिनींचा ।
शिवबाच्या जिव्हारी भिडला होता ।
होशील विजयी युद्धात तू ।
साक्षात्कार मग भवानीचा घडला होता ॥ ४ ॥

अपराध मोठ्ठा खानाचा । तो मराठ्यांना नडला होता ।
मग शिवरायरूपी नरसिंहाने ।
त्याला अक्षरशः टरटरा फाडला होता ॥ ५ ॥

आदिलशाही दरबारी मदमस्तीत जो ।
मराठ्यांना संपवतो, कडाडला होता ।
मग ढाई बिघा जमिनीत या इथेच ।
मराठ्यांनीच त्याला गाडला होता ॥ ६ ॥

– श्री. महेश मुळीक, डोंबिवली (पूर्व), जिल्हा ठाणे. (२२.३.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF