प.पू. दास महाराज आहेत हनुमानाचे रूप ।

प.पू. दास महाराज
कु. गौरी मुदगल

प.पू. दास महाराज यांच्याकडे
पाहून शिष्यभाव दाटून येतो ।
त्यांच्या प्रेमाने सर्व साधक
आनंदी होतात ॥ १ ॥

त्यांना पाहून भगवंत भेटल्याचा
खरा आनंद मिळतो ।
भगवंताप्रती भाव कसा
असायला हवा ।
हे त्यांच्या कृतीतून शिकायला मिळते ॥ २ ॥

पायाचा त्रास असूनही । देवाचे आज्ञापालन म्हणून ते
साधकांसाठी नामजप करतात ॥ ३ ॥

जसे प्रभु श्रीरामचंद्राचा नामजप करतांना
हनुमानाचे ध्यान लागायचे ।
तसे प.पू. दास महाराज परम पूज्यांच्या (टीप १) नामात,
ध्यानात आणि स्मरणात सतत असतात ॥ ४ ॥

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या

– कु. गौरी मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF