छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून वाटचाल करू हिंदु राष्ट्राकडे ॥

श्री. संकेत भोवर

उगवला सूर्य, करण्या अंधार दूर ।
वाघ जन्मला रायगडावर ॥
हिंदुत्वाच्या घोषणांचा झाला गजर ।
फुला-तोरणांनी सजले गडाचे द्वार ॥
ढोल, चौघडे, तोफा धडाडती ।
गडाचा कडे-कपार ॥ १ ॥

जन्म दिला जिजाऊमातेने ।
हा हिंदुत्वाचा पती ।
नामकरण केले ‘शिवछत्रपती’॥
इतिहास घडवण्या ।
जन्म घेतला या मराठी मातीत ।
उमेद आली आता ।
हिंदुत्वाच्या कार्यास येईल गती ॥ २ ॥

हिंंदुत्वाच्या कार्यासाठी समर्पित केले ।
जिजाऊंनी या लेकराला ॥
अन्याय आणि अत्याचार
यांविरुद्ध लढण्याचे ।
बालवयातच दिले बाळकडू
शिवरायाला ॥ ३ ॥

तरुणपणी आस लागली ।
हिंदवी स्वराज्याची ।
तलवार घेऊन भवानीमातेची ।
गर्जू लागले, ‘हर हर महादेव’ ॥ ४ ॥

समर्थ रामदासस्वामींच्या मार्गदर्शनाने ।
मावळ्यांना साथीला घेऊन ॥
हिंदवी स्वराज्याचा
रणसंग्राम घडवला ।
अफजलखानाचा कोथळा
काढला ॥ ५ ॥

तानाजी मालसुरे आणि बहिर्जी नाईक ।
यांच्या साथीने गनिमी कावा करून ।
बोटे छाटली शाहिस्तेखानाची ॥ ६ ॥

आपणही मावळ्यांसारखे ।
साधना करून आनंद घेऊया ॥
तळमळीने ध्येयप्राप्ती करूया ।
गुरुमाऊलीला आनंद देऊया ॥ ७ ॥

छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून ।
परात्पर गुरुदेवांच्या मार्गदर्शनाने ।
वाटचाल करू हिंदु राष्ट्राकडे ॥ ८ ॥

– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.२.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF