हनुमानचालीसा म्हणतांना साधना न करणार्‍या (सर्वसामान्य) व्यक्तीवर होणारे सूक्ष्मातील परिणाम !

(सौ.) योया वाले

१. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता आणि स्पंदने

१ अ. ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील चांगली स्पंदने : ५ टक्के’ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

२. ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

२ अ. भाव

२ अ १. भावाचे वलय व्यक्तीच्या अनाहत चक्रस्थानी कार्यरत होणे : हनुमानचालीसा म्हणतांना व्यक्तीमध्ये असलेल्या भावावर हे अवलंबून आहे.

२ आ. (मंत्रांतील) शक्ती

२ आ १. शक्तीचे चक्राकार वलय मणिपूर चक्रस्थानी कार्यरत होणे : हनुमानचालीसा म्हणतांना शक्ती प्रथम व्यक्तीच्या नाभीच्या ठिकाणी प्रवाहित होते आणि नंतर ती विशुद्धचक्रस्थानी जाते.

२ आ २. शक्तीच्या लहरी व्यक्तीच्या मणिपूर चक्रातून विशुद्धचक्रस्थानी प्रवाहित होणे

२ आ ३. शक्तीचे कण ईश्‍वराकडे (श्री हनुमानाकडे) प्रवाहित होणे : असे होणे म्हणजे व्यक्तीने ईश्‍वराला (श्री हनुमानाला) आळवल्यासारखे आहे.

२ इ. हनुमानतत्त्व

२ इ १. हनुमानतत्त्वाचा प्रवाह आशीर्वाद स्वरूपात व्यक्तीच्या आज्ञाचक्रस्थानी आकृष्ट होणे : व्यक्तीमध्ये हनुमानचालीसा म्हणतांना असलेल्या भावावर हे अवलंबून आहे.

२ इ २. हनुमानतत्त्वाचे वलय व्यक्तीच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत होणे : हनुमानचालीसा म्हणतांना व्यक्ती हनुमानाचे अस्तित्व अनुभवत असल्याने असे होते.

२ ई. श्रीरामतत्त्व

२ ई १. श्रीरामतत्त्वाचे वलय व्यक्तीच्या आज्ञाचक्रस्थानी कार्यरत होणे : हनुमानचालीसेत श्रीरामाचाही उल्लेख (स्तुती) असल्याने असे होते.

२ उ. चैतन्य

२ उ १. चैतन्याचा प्रवाह अनाहत चक्रस्थानी आकृष्ट होणे : हनुमानचालीसा म्हणतांना व्यक्तीला हनुमानाचे तत्त्व मिळत असल्याने असे होते.

२ उ २. चैतन्याचे वलय अनाहत चक्रस्थानी कार्यरत होणे

२ उ ३. चैतन्याचे कवच व्यक्तीच्या देहाभोवती निर्माण होणे : सर्वसामान्य व्यक्ती साधना करत नसल्याने हे चैतन्य अगदी थोडा काळच टिकते.

२ ऊ. त्रासदायक शक्ती (न्यून होणे)

२ ऊ १. व्यक्तीच्या देहाभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होणे : हनुमानचालीसेच्या पठणाने व्यक्तीवर आध्यात्मिक उपाय होत असल्याने असे होते.’

 

– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (२९.३.२०१९)

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now