धर्मांध महिलासुद्धा…!

नोंद

ठाणे येथे रेल्वे स्थानकाबाहेरील वाहनतळाजवळ आईच्या कुशीत झोपलेल्या दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करणार्‍या धर्मांध महिलेला (शाहिस्ता शेख) आणि तिच्या अल्पवयीन सहकार्‍याला पोलिसांनी अटक केल्याची घटना नुकतीच घडली. गुन्हेगारीमध्ये धर्मांध पुरुष पुढे आहेत अशा घटना आपण प्रतिदिन वाचतो. आता धर्मांध महिलाही कमी नाहीत, हे या उदाहरणांतून अधोरेखित होत आहे.

या महिलेने ज्या मुलीचे अपहरण केले ती मुलगी हिंदु आहे, हे महत्त्वाचे. यातूनच धर्मांधांचा लहान मुलांचे अपहरण करण्यामागे काय हेतू आहे, हे वेगळे सांगायला नको. धर्मांधांची लोकसंख्या वाढावी यासाठी धर्मांध कोणत्या स्तराच्या कृती करतात, याची कल्पनाच करू शकत नाही. धर्मांतर करणे, लव्ह जिहाद, एकापेक्षा अधिक पत्नी, अनेक मुलांना जन्म देणे, हिंदु महिलांवर अत्याचार करणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कृती करून भारतामध्ये धर्मांधांची लोकसंख्या कशी वाढेल यासाठी धर्मांध शक्य ते सर्व  प्रयत्न करत आहेत. धर्मांध हे सर्व राजरोसपणे करत असूनही धर्मांधांच्या या खेळी शासनकर्त्यांना खटकत नाहीत, हे विशेष आहे. आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी यावर कोणतीच ठोस उपाययोजना काढली नाही, असेच दिसते. यामुळे या धर्मांधांच्या क्रूरतेचा त्रास हिंदूंना सोसावा लागत आहे. हे असेच चालू राहिल्यास येणार्‍या काळात हिंदूंना बाह्य शत्रूपेक्षा देशांतर्गत शत्रूचा धोका अधिक असणार आहे, हे वेगळे सांगायला नको.

धर्मांधांची सर्व स्तरावरील सिद्धता पाहिल्यास हिंदूंना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येणार आहे, हे निश्‍चित. हिंदूंनो, येणार्‍या काळात जिवंत रहाण्यासाठी शासनकर्ते साहाय्य करतील, या भरवशावर राहून काही उपयोग होणार नाही. प्रत्येक हिंदूलाच यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करण्यासोबत हिंदु संघटन वाढवायला हवे. हे सर्व करत असतांना याला ईश्‍वरी अधिष्ठान असल्यास यश निश्‍चित मिळेल. ईश्‍वरी अधिष्ठान मिळण्यासाठी ‘भगवंताची भक्ती करणे’, हाच एकमेव उपाय आहे. कारण येणार्‍या काळात भगवंताविना कोणीच साहाय्य करू शकणार नाही. देशातील पुरो(अधो)गामी, बुद्धीप्रामाण्यवादी हे हिंदूंचा बुद्धीभेद करून हिंदू धर्मापासून कसे दूर जातील, यासाठी प्रयत्न करत आहेत. हिंदु धर्म अनादी, अनंत आहे. यातील प्रत्येक गोष्ट शास्त्राच्या आधारे सिद्ध करता येते. त्यामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी आपली बुद्धी ‘हिंदु धर्म कसा श्रेष्ठ आहे’, हे जाणून घेण्यासाठी लावली, तर त्याचा त्यांना आणि इतरांनाही लाभ होईल. बुद्धीप्रामाण्यवाद्यांना अशी बुद्धी होवो आणि सर्वच हिंदूंना भक्ती करण्याची बुद्धी होवो, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !

– वैद्या (कु.) माया पाटील, देवद, पनवेल.


Multi Language |Offline reading | PDF